व्हॉट्स अॅपवर येऊ शकते बंदी!

आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत एकत्रितपणे बोलण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या व्हॉट्स अॅपवर लवकरच बंदी घालण्याची शक्यता आहे. यूकेचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी जाहीर केलंय की जर ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आले तर व्हॉट्स अॅप आणि iMessage सारख्या चॅटिंग अॅपवर बंदी घालतील.

Updated: Jan 13, 2015, 08:46 PM IST
व्हॉट्स अॅपवर येऊ शकते बंदी! title=

मुंबई: आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत एकत्रितपणे बोलण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या व्हॉट्स अॅपवर लवकरच बंदी घालण्याची शक्यता आहे. यूकेचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी जाहीर केलंय की जर ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आले तर व्हॉट्स अॅप आणि iMessage सारख्या चॅटिंग अॅपवर बंदी घालतील.

कॅमरून यांनी ही घोषणा पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे केल्याचं कळतंय. सोमवारी कॅमरून यांनी सांगितलं, 'सध्या अशाप्रकारच्या अॅपचा सर्रास वापर केला जातोय. अशात या अॅपद्वारे होणाऱ्या संभाषणावर नजर ठेवणं सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या लोकांसाठी कठीण बनलंय. त्यामुळं अशा अॅपवर बंदी घातली पाहिजे.'

कॅमरून म्हणाले, 'या अंन्क्रिप्टेड चॅटवर नजर ठेवणं खूप कठीण बनलंय. फोन आणि पत्राद्वारे होणाऱ्या बोलण्यावर सुरक्षा एजंसी लक्ष ठेवत असे मात्र व्हॉट्स अॅप आणि अशा चॅटिंग अॅपच्या चर्चांवर लक्ष ठेवणं कठीण आहे. '

तर दुसरीकडे अनेक प्रायव्हसी ग्रुप्सनं पंतप्रधानांच्या या घोषणेचा विरोध केलाय. त्यांचं म्हणणं आहे की सिक्युरिटीच्या नावावर लोकांच्या खाजगी आयुष्यासोबत खेळू नये. खाजगी ग्रुप्सचं हे सुद्धा म्हणणं आहे की, अनेक देशांमध्ये या अॅप्सचा वापर सुरक्षेच्या दृष्टीनंही केला जातो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.