फेसबुकची प्रत्येक युजरवर नजर, ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन

जर आपण इंटरनेटवर अॅक्टिव्ह असाल तर आपण जगातील सर्वात प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकच्या नजरकैदेत आहात. मग तुम्ही फेसबुकवर ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन.

Updated: Apr 2, 2015, 05:04 PM IST
फेसबुकची प्रत्येक युजरवर नजर, ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन title=

मुंबई: जर आपण इंटरनेटवर अॅक्टिव्ह असाल तर आपण जगातील सर्वात प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकच्या नजरकैदेत आहात. मग तुम्ही फेसबुकवर ऑनलाइन असो किंवा ऑफलाइन.

नुकतंच ब्रिटनमधील एका आयटी संस्थेद्वारे केल्या गेलेल्या अध्ययन आणि तपासानुसार ही बाब समोर आलीय की, फेसबुक प्रत्येक युजरला ब्राउजिंग दरम्यान ट्रॅक करत राहतं. जसं आपण इंटरनेट सुरू करता फेसबुक आपल्या सिस्टिममध्ये तयार होणाऱ्या कुकीजद्वारे आपल्यावर नजर ठेवतं आणि आपण कोणत्या वेबसाइटवर जात आहात? कुठं क्लिक करत आहात? काय शोधताय? याकडे लक्ष ठेवतं.

युजरच्या सर्च हिस्ट्रीबद्दल माहिती मिळवून फेसबुक प्रत्येक युजरची आवड-निवड पाहतं. एकदा फेसबुकला कळलं की, तुम्ही नक्की कोणतं प्रॉडक्ट, कोणती लिंक पाहता. मग त्याचसंबंधीच्या प्रॉडक्टची जाहिरात आपल्या समोर ठेवतं. एकूण फेसबुक जाहिरातधारकांना आणि कंपन्यांना आपल्या युजर्सची मागणी पूर्ण करतं. 

फेसबुक असं का करतंय?

आपल्या माहितीसाठी सांगतो, फेसबुक आपल्या प्रत्येक युजरच्या प्रत्येक लाइक सोबत जवळपास १ कोटी ३० लाख वेबसाइटशी जोडला गेलाय.  ज्यात हेल्थ आणि अनेक सरकारी वेबसाइटचाही सहभाग आहे. म्हणजे जर आपण इंटरनेटवर काही उघडता तर आपण फेसबुकच्या नजरेखाली येता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.