प्रियाचं फेसबुक A/c भारी, बेतलं`जीवावरी`

फेसबुक आता हे एक व्यसन झालं आहे... ते तुम्हांला जडलं की, मात्र त्याची सवयच तुम्हांला लागून राहते. फेसबुकचा वापर कसा होतो...

Updated: Oct 23, 2012, 05:48 PM IST

www.24taas.com, अमळनेर
फेसबुक आता हे एक व्यसन झालं आहे... ते तुम्हांला जडलं की, मात्र त्याची सवयच तुम्हांला लागून राहते. फेसबुकचा वापर कसा होतो... हे आजच्या तरूण पिढीला सांगायलाच नको... ते त्यात चांगलेच पारंगत झाले आहेत. मात्र आता हेच फेसबुक सध्या मध्यमवयीव लोकांना जास्त आकर्षित करीत आहे. मात्र फेसबुकवरील वाढता चावटपणा ही चांगलीच डोकेदुखी ठरू लागली आहे. आणि अशा चावटपणामुळेच एका शिक्षकाला आपलं थोबाड रंगवून घ्यावं लागलं आहे.
अमळनेरमध्ये एका शिक्षकांने प्रिया नावाने एक अकांऊट ओपन केलं आणि तरूणांनीही त्या अकांऊटला मोठ्या प्रमाणात भेट दिली. एका तरूणाने पाठवलेली फ्रेन्डशिप रिक्वेस्ट त्यांनी पटकन स्वीकारली. या दोघांमध्ये रोजच संवाद होत गेले... वाढत गेले... चक्क प्रेमाने फुलतही गेले... इकडे स्वत:च्या नको त्या अक्कल हुशारीवर गुरुजी एकदम जाम खूष होते. तर तिकडे नाशिकला अमळनेरचा तो तरुण कमालीचा कासावीस झाला होता. अखेरीस विज्ञान आणि तंत्रज्ञानालाही काही मर्यादा असतात. या मर्यादांच्या माध्यमातूनच प्रिया बाबतची माहिती त्या तरुणाला कळाली.
प्रिया कशी असेल? आपल्याला पाहिल्यानंतर तिची प्रतिक्रिया आणि प्रतिसाद काय असेल? तिच्याशी बोलताना सुरवात कशाने करायची? सहा महिन्यांपासून तुंबलेल्या प्रेमाची रेशीमगाठ कशी उलगडायची? या विचाराने स्वैरभैर झालेला तो युवक आणि त्याचे मित्र प्रियापर्यंत अर्थातच "त्या गुरुजीं` पर्यंत पोहोचले. त्यानंतर त्या मुलाने आणइ त्याच्या मित्रांनी गुरुजींवर लाथाबुक्‍क्‍यांच्या प्रेमाची बरसात केली. त्यामुळे गुरुजींचे तोंड चांगलेच "रंगले` आजूबाजूच्या काहींना हा प्रकार कळाल्याने लगेचच तो गावभर पसरला.