मोहनभाई पुडलावाल्याचा पुडला लयी भारी

पुडलाची टेस्टही अनोखी आहे, या सोबत मिळणाऱ्या गोड़, तिखट आणि नारळाच्या चटणीची लज्जतही न्यारीच आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 16, 2017, 07:04 PM IST

मुंबई : पुडला हा गुजराती नाश्त्याचा पदार्थ आहे, पुडलाची टेस्टही अनोखी आहे, या सोबत मिळणाऱ्या गोड़, तिखट आणि नारळाच्या चटणीची लज्जतही न्यारीच आहे. पुडला हे बेसन आणि काही भाज्यांचं कॉम्बिनेशन आहे.

मोहनभाई हे रेस्टॉरंटचे मालक असल्याने त्यांच्या नावाने मोहनभाई पुडलावाला असं ओळखलं जातं. लाला फास्ट फूड या नावानेही मोहनभाईचं हे दुकान प्रसिद्ध आहे. मोहनभाई पुडलावाला यांचा पुडला दक्षिण मुंबईतील व्यापारी पेठेत फारच प्रसिद्ध आहे. 

ब्रेडसोबत पुडला आणि गोड तिखट चटणीचं कॉम्बिनेशन चाखण्यासाठी कधी या भागात गेलात तर नक्की जा, तुम्हाला संपूर्ण पत्ता या व्हिडीओच्या शेवटी पाहायला मिळेल.