आयफोन-६ पहिल्याच ग्राहकांने आपटला जमिनीवर

अॅपल कंपनीने मोबाईल बाजारात आपला दबदबा निर्माण केलाय. अॅपलचा फोन घेण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडतात. अनेकांनी दोन दिवस रांगा लावून आयफोन-६ घेतला. मात्र, हा फोन घेणाऱ्या पहिल्याच ग्राहकांने चक्क आपला स्मार्टफोन जमिनीवर आपटला.

Reuters | Updated: Sep 19, 2014, 08:46 PM IST
आयफोन-६ पहिल्याच ग्राहकांने आपटला जमिनीवर   title=

सिडनी : अॅपल कंपनीने मोबाईल बाजारात आपला दबदबा निर्माण केलाय. अॅपलचा फोन घेण्यासाठी ग्राहकांच्या उड्या पडतात. अनेकांनी दोन दिवस रांगा लावून आयफोन-६ घेतला. मात्र, हा फोन घेणाऱ्या पहिल्याच ग्राहकांने चक्क आपला स्मार्टफोन जमिनीवर आपटला.

अॅपलने नवा लूक असलेला आणि थोडा मोठा स्मार्टफोन आयफोन-६ बाजारात आणला. हा फोन खरेदीसाठी तरुणांच्या उड्या पडल्यात. हा फोन प्रथम घेण्याचा मान एका ऑस्टेलियन तरुणांने पटकावला. 

जॅक या तरुणाचा बाईट घेण्यासाठी मीडियाची प्रतिनिधी त्याच्याकडे धावली. हा फोन कसा दिसतो. त्यासाठी त्याला विचारु लागली. त्यांने उत्साहाच्या भरात घेतलेला स्मार्टफोन दाखविण्याचा प्रयत्न केला. फोन बॉक्समधून बाहेर काढताना हातातून खाली पडला आणि जमिनीवर पडला. फोनचे मागचे कव्हर निसटले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.