‘सॅमसंग’च्या ४८ हॅन्डसेट्ची ऑनलाईन विक्री बंद

सध्या मोबाईल कंपन्या आपल्या नवनवीन मोबाईल्सची विक्री ऑनलाईन करण्यावर भर देताना दिसतायत पण, याउलट सॅमसंगनं मात्र आपल्या लोकप्रिय ४८ हॅन्डसेटसची ऑनलाईन विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Sep 19, 2014, 08:17 AM IST
‘सॅमसंग’च्या ४८ हॅन्डसेट्ची ऑनलाईन विक्री बंद title=

मुंबई : सध्या मोबाईल कंपन्या आपल्या नवनवीन मोबाईल्सची विक्री ऑनलाईन करण्यावर भर देताना दिसतायत पण, याउलट सॅमसंगनं मात्र आपल्या लोकप्रिय ४८ हॅन्डसेटसची ऑनलाईन विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 

सॅमसंगनं आपल्या ऑफलाईन रिटेलर्सना टार्गेट आणि प्रमोट करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीसाठी हा तोट्याचा निर्णयही ठरू शकतो. 

शाओमी आणि मोटरोलासारख्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ऑनलाईन रिटेलर्सची मदत घेतलीय. अशावेळी ऑनलाईन बाजाराकडे पाठ फिरवणं सॅमसंगला महागात पडू शकतं.

सॅमसंगनं आपल्या ज्या ४८ हॅन्डसेटसची ऑनलाईन विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय त्यात कंपनीचा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन गॅलक्सी अल्फा आणि नोट – ४ या मोबाईल्सचाही समावेश आहे. 

ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची यामुळे निराशा झाली असली तरी ‘ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन’साठी ही मात्र सुखद बातमी ठरू शकते. ऑनलाईन बाजारातून ‘ऑफलाईन’ होण्याचा सॅमसंगसारख्या मोठ्या कंपनीचा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.  

ऑनलाईन रिटेलर्सकडून ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक ऑफर आणि डिस्काऊंट मिळतात त्यामुळे सध्या ग्राहकांचा ऑनलाईन खरेदीवर जास्त भर दिसतो. आता, कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम कसा दिसून येतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.