तीन दिवसांत एक कोटी आयफोनची विक्री

लाखभर रुपये किंमत असलेल्या आयफोन-६ आणि आयफोन-६ प्लस या अॅपलच्या अत्याधुनिक फोनच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. गेल्या तीन दिवसांत तब्बल एक कोटी आयफोनची विक्रमी विक्री झाली आहे.

Updated: Sep 23, 2014, 08:56 PM IST
तीन दिवसांत एक कोटी आयफोनची विक्री

मुंबई: लाखभर रुपये किंमत असलेल्या आयफोन-६ आणि आयफोन-६ प्लस या अॅपलच्या अत्याधुनिक फोनच्या खरेदीसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. गेल्या तीन दिवसांत तब्बल एक कोटी आयफोनची विक्रमी विक्री झाली आहे.

अॅपलने शुक्रवारी आयफोन-६ आणि आयफोन-६ प्लस हे दोन फोन अमेरिकेसह कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, हॉंगकॉंग, जपान, प्युरटोरिको, सिंगापूर आणि इंग्लंडमध्ये ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्री होऊनही आपण समाधानी नसल्याचे ऍपलचे सीईओ टीम कूक यांनी सांगितले. मात्र ऍपलवर विश्वाास ठेवणार्याओ असंख्य ग्राहकांचे त्यांनी आभार मानले आहेत. आयफोन-६ हा फोन १७ ऑक्टोबरपर्यंत भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.