मुंबई : तुम्हीही खरेदी करताना किंवा इतर वेळी पैसे कॅशमध्ये देण्यापेक्षा एटीएम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
कार्डवर कुठेही पिन नंबर न लिहिणं, तुमचा पासवर्ड कुणाशीही शेअर न करणं, कार्ड हरवल्यास तात्काळ बँकेशी संपर्क करून हे कार्ड बंद करून घेणं अशा काही गोष्टी तुम्हाला यासाठी माहीत असणं आवश्यक आहे.
पण, याशिवाय आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या एटीएम कार्ड वापरताना तुम्हाला लक्षात असायला हव्यात...
१. अनेकदा एटीएम सेंटरमधून पैसे काढल्यानंतर तिथे मोजत बसू नका, असा सल्ला दिला जातो. परंतु, थोडी काळजी घेतली आणि पैसे मोजले तर तुम्हाला आर्थिक फटका बसण्यापासून तुम्ही वाचू शकता. अनेकदा तुम्ही जितके पैसे एटीएम मशीनमध्ये नोंदवले असतील त्यापेक्षा कमी पैसे मशीनमधून बाहेर आल्याची तक्रार ग्राहकांनी नोंदवलीय. पण, घाबरू नका... अशा वेळी तात्काळा बँकेशी संपर्क साधा... तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतील.
२. एटीएम मशीनमधून तुमचे पैसे बाहेर आले की ते हातात घेऊन तुम्ही लगेचच बाहेर पडत असाल तर थांबा... ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर मशीनवर कॅन्सलचं बटण दाबायला विसरू नका.
३. तुम्ही एटीएम सेंटरमध्ये आहात... आणि पैसे काढत असताना तुमच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला तुम्ही दाबत असलेला पिन नंबर नजरेस पडणार नाही, याचीही काळजी घ्या. कदाचित त्यांचं लक्ष तुमच्यावरच असू शकेल.
४. तुमच्या मोबाईलवर बँक अॅप्लिकेशन असेल तर तुमचा मोबाईल कुणाच्याही हातात देऊ नका, पासवर्ड कुणाशीही शेअर करू नका.... शिवाय, आपल्या अकाऊंटचा मिनी बॅलन्स तुम्ही वेळच्या वेळी चेक करत चला... त्यामुळे एखादी गडबड तुमच्या तत्काळ ध्यानात येऊ शकतते.
५. आणि सर्वात शेवटी... तुम्ही चांगले एटीएम युझर बना... म्हणजेच काय तर ट्रान्झॅक्शन करण्यासाठी एटीएममध्ये फार वेळ घालवू नका... तुमच्या मागे कुणीतरी त्यांचे ट्रन्झॅक्शन करण्यासाठी वाट पाहत असतील.