अलाहाबाद : फेसबुकच्या प्रोफाइलवर खोटा फोटा लावून अलाहाबाद येथील बहरिया परिसरातील एका तरुणाने एका तरुणीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले. तिला लग्न करण्यासाठी बोलवून घेतले. मात्र, त्याचा चेहरा विचित्र असल्याचे बघताच तिने लग्नाला नकार दिला. त्यामुळे तिला चक्क डांबून ठेण्यात आले.
हा तरुण एवढ्यावर थांबला नाही. त्याने तरुणीवर धर्म परिवर्तनासाठी दबाब टाकला. तसा त्याच्यावर आरोप करण्याता आला आहे. दरम्यान, संतप लोकांना ही बाब समजल्यानंतर बहरिया पोलीस स्टेशनवर धडक मारत कैद करण्यात आलेल्या मुलीला सोडविण्याची मागणी केली. पोलिसांनी तरुणाच्या घरी छापा टाकला असताना तरुण पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, त्याच्या नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
बहरिया बाजार येथे राहणार अलीम (नाव बदलले आहे.) याने फेसबुकवर एका मॉडेलिंक करण्याऱ्या युवकाचा फोटो प्रोफाईल म्हणून ठेवला होता. त्याने लखनऊ येथील एका मुलीला फ्रेंडशिप पाठवली. त्यानंतर चॅटिंग करत तिला प्रेम जाळ्यात ओढले. अलीम सुंदर असून तो मोठा व्यावसायिक असल्याचे समजून लग्नासाठी ती तरुणी तयार झाली. मात्र, वस्तूस्थिती समोर अल्यानंतर तिने नकार देल्याने तिच्यावर अनर्थ ओढवला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.