नवी दिल्ली : टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर वोडाफोन इंडिया लिमिटेडने दिल्ली-एनसीआर येथील ग्राहकांसाठी ४जी नेटवर्क सिमकार्डची विक्री सुरु केलीये. सिम कार्ड खरेदी करणाऱ्यांना एक जीबी डाऊनलोडिंग मोफत दिले जाणार आहे.
दिल्ली-एनसीआरमधील तब्बल एक करोड ग्राहकांना या हाय स्पीड इंटरनेटचा सुविधा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे वोडाफोन इंडियाचे मुख्य अपूर्व मेहरोत्रा यांनी सांगितले.
यापूर्वी केरळ आणि कर्नाटकमध्ये वोडाफोनची ४जी सर्व्हिस सुरु झालीय. वोडाफोनची ही हाय स्पीड सर्व्हिस मुंबई, कोलकाता आणि बंगळूरु येथेही यंदाच्या वर्ष अखेरीपर्यंत ही सेवा सुरु होणार आहे.