होंडाची 'लिओ' ठरतेय तरुणांसाठी आकर्षण

होंडा माटारसायकल अॅन्ड स्कूटर इंडियानं (एचएमएसआय) शुक्रवारी आपली एक नवीन बाईक लॉन्च केलीय. ११० सीसीच्या 'लिवो' या बाईकची दिल्ली शोरुममधील किंमत आहे ५५,४८९ रुपये. 

Updated: Jul 11, 2015, 09:51 AM IST
होंडाची 'लिओ' ठरतेय तरुणांसाठी आकर्षण  title=

नवी दिल्ली : होंडा माटारसायकल अॅन्ड स्कूटर इंडियानं (एचएमएसआय) शुक्रवारी आपली एक नवीन बाईक लॉन्च केलीय. ११० सीसीच्या 'लिवो' या बाईकची दिल्ली शोरुममधील किंमत आहे ५५,४८९ रुपये. 
 
होंडाची ११० सीसीच्या ड्रीम सीरिजचे तीन मॉडल्स अगोदरपासूनच मार्केटमध्ये आहेत. यामध्ये 'ड्रीम युगा'चाही समावेश आहे.

कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ केइता मुरामात्सू यांच्या म्हणण्यानुसार, लिवो भारताच्या मार्केटसाठी उत्साहवर्धक मोटारसायकल्सच्या मॉडेलपैंकी एक आहे. या बाईकलादेखील आक्रमक पद्धतीनं बाजारात उतरवण्याची कंपनीची तयारी आहे. 

कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतात यंदा तब्बल १५ नवी वाहनं सादर केली जाणार आहेत... आणि हे आपलं वचन आम्ही पूर्ण करणार आहोत. 

कंपनीनं ११० सीसीच्या लिवोसहीत विद्यार्थी, कामगार वर्ग आणि युवा उद्योगकर्त्यांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं ही बाईक बाजारात उतरवलीय. 

ही मोटारसायकल दोन मॉडल्समध्ये ५२,९८९ आणि ५५,४८९ रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.