मुंबई : कॅण्डी क्रश...कॅण्डी क्रश...कॅण्डी क्रश...सध्या या गेमने फेसबुक युजर्स हैराण झाले आहे. हा गेम फेसबुकवर पाठ सोडण्याचे नाव घेत नाही. तुमच्या फ्रेंड्सकडून गेमच्या रिक्वेस्टनं युजर्संना फुकटा त्रास होत आहे. त्यावर उपायही आहे. ज्यांना हा गेम नको असेल त्यांना अनब्लॉग करता येते बरे!
एकाध्या गेमनं प्रत्येकी 10 मिनिटाने फेसबुकचे नोटीफिकेशन पिंग होत असते. या रिक्वेस्टच्या नादात मित्रमंडळींमध्ये फेसबुक युद्ध सुरु झालेत. जास्तच त्रास होणाऱ्यांनी तर चक्क त्या लोकांना अनफ्रेंडच केलय.
थट्टा उडवणारे फोटो
गेमचा त्रास एवढा वाढलाय की, त्या गेमची थट्टा उडवणारे छायाचित्र सोशल नेटवर्कींगवर फिरु लागलेत. विनोदी फोटो बनवून रिक्वेस्ट पाठवण्यांना तो फोटो टॅग करायला सुरुवात झाली. त्यानंतर अनेक सोशल नेटवर्कींग साईटवर हे फोटो वायरल झाले आहेत.
सध्या सामान्य जनता महागाईमुळे कंटाळली तर फेसबुक युजर्स कॅण्डी क्रशच्या रिक्वेस्टने त्रालली आहेत. 'क्रॅश थिस कॅण्डी' नावाने तर काही लोकांनी मोहीमही चालवली. प्रत्येकजण या अडचणीपासून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात आहे.
मात्र जास्त लोक हैराण आहेत की कसं या गेमच्या रिक्वेस्ट ब्लॉक करता येईल.
काही जण तर आपल्या टाइमलाइनवर स्टेटस अपडेट करतात की, 'प्लीज कॅण्डी क्रशच्या रिक्वेस्ट पाठवू नका'...आणि पाठवणाऱ्यांना लोकांना ते स्टेटस टॅग करतात.
गेमचा तुम्ही कसा कराल 'गेम'
1. फेसबुक पेजवर लॉग इन करा.
2. त्या पेजर कोणती रिक्वेस्ट असेल तर त्या X वर क्लिक करा त्यानंतर ब्लॉक करा.
3. डाव्या बाजूला 'Invitations' वर क्लिक करा. आता कोणती Invitations दिसत असेल तर त्यालाही X वर क्लिक करुन ब्लॉक करा.
अभिनंदन! तुम्ही कॅण्डी क्रश सागासारख्या अनेक गेमपासून तुमची सुटका झाली आहे. मात्र तुम्ही स्वतः हा गेम खेळू शकता. पण जर तुम्ही या नावाची चिड येत असेल तर, ते ब्लॉक करु शकता त्यासाठी...
1. फेसबुक पेजवर लॉग इन करा. वरच्या उजव्या बाजूला security शॉर्टकटसवर क्लिक करा. त्यात गेल्यानंतर सर्वात शेवटी 'See More Settings'क्लिक करा.
2. जे पेज ओपन होईल, त्याच्या डाव्या बाजूला Blocking वर क्लिक करा.
3. सर्वात शेवटी Block Appsमध्ये अॅप सर्च करा आणि क्लिक करुन पूर्णपणे ब्लॉक करा. कधी अनब्लॉक करवायसे वाटले तर येथूनच अनब्लॉक करु शकता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.