close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

असा करा अॅडल्ट कन्टेंन्ट ब्लॉक

दिवसेंदिवस कॉम्पूटर आणि इंटरनेट यांचा वापर वाढतच चालला आहे. केवळ प्रौढांमध्येच नाही तर अगदी लहान मुलंही याचा वापर सर्रासपणे करत आहेत. इंटरनेट आणि कॉम्पूटरचे जसे वाईट तसेच चांगलेदेखील फायदे आहेत.

Updated: May 28, 2016, 06:43 PM IST
असा करा अॅडल्ट कन्टेंन्ट ब्लॉक

म्ंबई : दिवसेंदिवस कॉम्पूटर आणि इंटरनेट यांचा वापर वाढतच चालला आहे. केवळ प्रौढांमध्येच नाही तर अगदी लहान मुलंही याचा वापर सर्रासपणे करत आहेत. इंटरनेट आणि कॉम्पूटरचे जसे वाईट तसेच चांगलेदेखील फायदे आहेत.
 

कनेक्टीव्हीटीसोबतच कॉम्पूटर आणि इंटरनेट याचा वापर अभ्यास आणि नवनवीन गोष्टी शिकण्याकरिता होतो. मात्र जेव्हा या अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग लहान मुले करतात तेव्हा काळजी घेणेही तितकेच महत्वाचे असते. कॉम्पूटर आणि इंटरनेटवर जशी उपयुक्त माहिती आहे तशीच अशीही माहिती असते जी तुम्ही लहान मुलांपासून दूर ठेवणेच इष्ट समजता. या माहितीचा बालमनावर वाईट परिणाम होऊ शकतो.

 

 

कसे कराल अॅडल्ट कन्टेंन्ट ब्लॉक

सेफसर्च - अॅडल्ट साइट्स आणि चित्र ब्लॉक करण्याऱ्यासाठी सेफसर्चचा वापर करू शकता. 

जर तुम्हाला इंटरनेट एक्सप्लोररवरून माहिती ब्लॉक करायची असेल तर इंटरनेट एक्स्प्लोररमध्ये जाऊन टूल्समध्ये इंटरनेट हा पर्याय निवडावा त्यात कन्टेंन्ट अॅडवायजर इनेबल करावा.

मायक्रोसॉफ्ट फॅमिली सेफ्टी- हा विंडोजचा पावरफुल प्रोग्रॅम आहे जो लहान मुलांशी निगडीत नसलेल्या गोष्टी ब्लॉक करतो.

फॅमिली शील्ड सॉफ्टवेयर- हा सगळ्यात सोप्पा पर्याय आहे. फॅमिली शील्ड सॉफ्टवेयर तुम्ही तुमच्या कॉम्पूटर किंवा इंटरनेटमध्ये इंन्स्टॉल केला तर सर्व अॅडल्ट कन्टेंन्ट ब्लॉक होतो.