नोकरी बदलतांना पाहा असा कराल पीएफ ऑनलाइन ट्रान्सफर

नोकरी बदलतांना सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे भविष्य निधी म्हणजेच पीएफ ट्रान्सफर करणं. मात्र आता आपण आपला PF अगदी सोप्या पद्धतीनं ऑनलाइन ट्रान्सफर करू शकतो. कारण आता पीएफ पेपरमुक्त करून ऑनलाइन केलंय.

Updated: May 4, 2015, 08:46 PM IST
नोकरी बदलतांना पाहा असा कराल पीएफ ऑनलाइन ट्रान्सफर  title=

नवी दिल्ली: नोकरी बदलतांना सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे भविष्य निधी म्हणजेच पीएफ ट्रान्सफर करणं. मात्र आता आपण आपला PF अगदी सोप्या पद्धतीनं ऑनलाइन ट्रान्सफर करू शकतो. कारण आता पीएफ पेपरमुक्त करून ऑनलाइन केलंय.

यासाठी खास एक वेबसाइट बनवली गेलीय. ज्यावर जावून आपण आपल्या पीएफशी निगडित माहिती चेक करू शकतो. http://memberclaims.epfoservices.in/check_eligibility.php

आपण कसा ट्रान्सफर कराल पीएफ पाहा -

नवं अकाऊंट उघडणं - 
पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी सर्वात पहिले EPFO वेबसाइटवर रजिस्टर करा. ज्यात मोबाइल नंबर, ओळख पत्र आणि काही इतर डॉक्यूमेंट्सची गरज असेल.

मेंबर क्लेम - 
यात ईपीएफओ मेंबर क्लेम पोर्टल निवडा. ज्यात आपल्याद्वारे दिलेले डॉक्यूमेंट्स आणि ओळखपत्राची तपासणी होते आणि सर्वकाही बरोबर असल्यास मेंबर पोर्टल उघडतं.

ट्रान्सफर क्लेम-
यात आपला पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी तीन भागांमध्ये वाटला जातो. 'पार्ट ए'मध्ये वैयक्तीक माहिती विचारली जाते. त्यानंतर 'पार्ट बी'मध्ये पीएफ अकाउंट नंबर आणि माजी कंपनीची माहिती सांगावी लागते. त्यानंतर पार्ट-सी ज्यात आपल्या नव्या संस्थेविषयी विचारलं जातं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.