यावर्षी अमेरिकेला मागे टाकणार भारत!

इंटरनेटचा वापर आणि त्याचं जाळं संपूर्ण जगात पसरलंय. मात्र यंदा इंटरनेट युजर्सच्या आकड्यांमध्ये भारत अमेरिकेला मागे टाकणार आहे. 2018च्या अखेरपर्यंत भारतात नेट वापरणाऱ्यांची संख्या 500 लाख होईल. गूगल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजन आनंद यांनी हे स्पष्ट केलंय. 

Updated: Aug 13, 2014, 02:23 PM IST
यावर्षी अमेरिकेला मागे टाकणार भारत! title=

नवी दिल्ली: इंटरनेटचा वापर आणि त्याचं जाळं संपूर्ण जगात पसरलंय. मात्र यंदा इंटरनेट युजर्सच्या आकड्यांमध्ये भारत अमेरिकेला मागे टाकणार आहे. 2018च्या अखेरपर्यंत भारतात नेट वापरणाऱ्यांची संख्या 500 लाख होईल. गूगल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजन आनंद यांनी हे स्पष्ट केलंय. 

आनंद यांनी सांगितलं की, "ज्या स्पीडनं भारतात इंटरनेटच्या युजर्सच्या संख्येत वाढ होतेय, 2018पर्यंत देशात 500 लाख नेट युजर्स होतील. ग्राहकांच्या या संख्येत यावर्षीच्या अखेरपर्यंत भारत अमेरिकेलाही मागे टाकेल. 2018पर्यंत भारतात अमेरिकेच्या तुलनेत दुप्पट युजर्स असतील. तेव्हा देशातील अर्धी लोकसंख्या इंटरनेटचा वापर करत असेल."

फिक्कीच्यावतीनं आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम "डिजिटायजिंग इंडिया'मध्ये बोलतांना राजन आनंद यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं भारतात इंटरनेट युजर्सची संख्या 10 लाखांहून 100 लाख व्हायला केवळ 10 वर्ष लागले. आता देशात दर 5 वर्षांनी लाखों युजर्स नेटशी जोडले जात आहेत. संध्या भारतात 200 लाख युजर्स नेटचा वापर करतायेत. 

आनंद म्हणाले, यंदा लोकसभा निवडणुकीत शहरातील अनेक लोक नेटसोबत जोडल्या गेले असं बोललं जातंय. मात्र नेटचा प्रभाव आधीपासूनच आहे आणि पुढे 2019मध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशातील अर्धी लोकसंख्या नेटचा वापर करणारी असेल. 

तसंच आता ग्राहकांच्या खरेदीची पद्धतही बदललीय. सध्या ऑनलाईन शॉपिंगची मागणी खूप वाढलीय. 2014मध्ये जगातील संपूर्ण लोकसंख्या (7 अब्ज)मध्येही 2.8 अब्ज नागरिक नेटचा वापर करतायेत. 2020 पर्यंत ही संख्या 5 अब्जांवर जाण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.