७ ऑक्टोबरपासून भारतात आयफोन-६चं बुकिंग सुरू

भारतात आयफोन ६ सीरिजचं अॅडव्हान्स बुकिंग ७ ऑक्टोबरपासून सुरू होईल. अॅपल इंडियानं आज ही माहिती दिलीय.

Updated: Oct 6, 2014, 12:14 PM IST
७ ऑक्टोबरपासून भारतात आयफोन-६चं बुकिंग सुरू title=

नवी दिल्ली: भारतात आयफोन ६ सीरिजचं अॅडव्हान्स बुकिंग ७ ऑक्टोबरपासून सुरू होईल. अॅपल इंडियानं आज ही माहिती दिलीय.

कंपनीनं सांगितलं की, आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस भारतात १७ ऑक्टोबरपासून उपलब्ध होईल. हा फोन ‘अॅपल ऑथराइज्ड रिसेलर्स’ नेटवर्कच्या माध्यमातून उपलब्ध होईल. 

कंपनीनं सांगितलं, ग्राहक या फोनची बुकिंग ७ ऑक्टोबरपासून करू शकतात. कंपनीनं किंमतींबाबत असलेल्या अफवांना पूर्णविराम देत त्याच्या किमती काय ते सांगितलंय. १६ जीबी  iPhone 6 ची भारतीय बाजारात  ५३,५०० रुपये किमतीला मिळेल,  तर ५.५ इंच स्क्रीन असलेला iPhone 6 Plus चू सरुवातीची किंमत ६२, ५०० रुपये असेल. ६४ जीबी आणि १२८ जीबीच्या ४.७ इंच आयफोन ६च्या किमती ६२,५०० आणि ७१,५०० प्रत्येकी अशा असू शकतात. तर ६४ जीबी वॅरिएंटची किंमत ७१,००० आणि १२८ जीबी मॉडेलची किमत ८०, ५०० रुपये असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.