कॅलिफोर्निया : ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसह संस्थापक जॅक डोर्सी यांना जीवे मारण्याची धमकी, इसीस या दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनी दिलीय.
एका निनावी फोरमद्वारे फुल्या मारलेले डोर्सी यांचे छायाचित्र आहे. त्यावर डोर्सी यांना जिवे मारण्याची धमकी देणारा संदेश देण्यात आलीय.
दहशतवादी संघटनांचे ट्विटर अकाऊंट बंद केल्यामुळे इसीसच्या समर्थकांनी या छायाचित्र शेअरिंग साईटवर एक छायाचित्र पोस्ट करून धमकी देण्यात आली आहे.
तसेच छायाचित्राच्या खाली अरेबिक भाषेत मजकूरही लिहिला आहे. त्यामध्ये आमच्यासोबतचे आभासी युद्ध तुमच्यावर खरे युद्ध लादू शकते, अशा शब्दात ट्विटरच्या कर्मचाऱ्यांसह, संस्थापक डोर्सी यांना धमकावण्यात आले आहे.
"तुम्ही अपयशी युद्धाला सुरुवात केली आहे. आम्ही सुरुवातीपासूनच हे तुमचे युद्ध नसल्याचे म्हटले आहे. पण तुम्हाला ते समजत नाही".
तुम्ही सातत्याने आमची ट्विटर खाती बंद करत आहात. जेव्हा आमचे सिंह तुमच्याकडे येऊन तुमचा जीव घेतील त्यानंतर तुम्ही जीवनात परत येऊ शकणार नाहीत,' असंही धमकावण्यात आलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.