www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इसुजू मोटर्सनं आपली डी-मॅक्स स्पेस कॅब लॉन्च केलीय. वर्षाच्या सुरुवातीलाच भरलेल्या एका ऑटो एक्सपोमध्ये ही कॅब सादर करण्यात आली होती आता कंपनीनं अधिकृतरित्या ही कार लॉन्च केलीय. दोन केबिन आणि दो डेक ऑप्शनसोबत ही कार तुम्हाला मिळू शकेल.
या गाडीच्या बेसिक व्हर्जनची किंमत मुंबई एक्स शोरुममध्ये 5.99 लाख रुपयांपासून सुरू होईल. डी मॅक्स सिंगल कॅब फ्लॅट डेकसोबत असेल. तर डी मॅक्स स्पेस कॅब फ्लॅट डेक आणि ऑर्क्ड डेक या ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल.
ही गाडी सफेद, सिल्वर आणि निळ्या रंगात उपलब्ध असेल. 5.3 मीटर लांब, 1.72 मीटर रुंद आणि 1.65 मीटर इंच ही कॅब आहे. 76 लीटरचा फ्युएल टँक यामध्ये दिला गेलाय.
स्पेस कॅबमध्ये दोन दरवाजे दिले गेलेत. यामध्ये फ्रंट सीट आहे आणि फ्रंट सीटच्या मागे थोडा स्टोअरेज स्पेस दिला गेलाय. पिकअप सेगमेंटमध्ये डी-मॅक्स स्पेसचा मुकाबला टाटाच्या जिऩॉन आणि महिंद्राच्या जेनियोशी असेल. इसुजूनं भारतात पहिल्यांदाच सिंगल आणि डबल कॅब आणलीय.
डी मॅक्स स्पेस कॅबमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. या गाडीची लोडींग कॅपेसिटी 1.2 टन आहे. या गाडीला युटिलिटी व्हेईकल म्हणून सादर करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.