नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या एन्ट्रीने टेलीकॉम सेक्टरमध्ये आता डेटा टेरीफ वॉर सुरू झाले आहे. व्होडाफोन इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी फ्लॅक्स प्लॉन लॉन्च केला आहे. आता आपल्या ४ जी प्लानला रिव्हाइज केले आहे.
हे प्लान पोस्टपेड ग्राहकांसाठी सुरूवातीला मुंबईतून सुरू करण्यात आले आहे.
२ जीबी ४जी आणि ३ जी डेटाची किंमत ३५० रुपये झाली आहे ती सुरूवातीला ४५० रुपये होती.
३ जीबी ४जी आणि ३ जी डेटाची किंमत ४५० रुपये झाली आहे ती सुरूवातीला ६५० रुपये होती.
५ जीबी ४जी आणि ३ जी डेटाची किंमत ६५० रुपये झाली आहे ती सुरूवातीला ८५० रुपये होती.
६ जीबी ४जी आणि ३ जी डेटाची किंमत ७५० रुपये तर ८ जीबी डेटासाठी ८५० रुपये द्यावे लागणार आहे.
१० जीबी ४जी आणि ३ जी डेटाची किंमत ९९९ रुपये तर १५ जीबी डेटासाठी १४९९ रुपये तर २० जीबी डेटासाठी १९९९ रुपये द्यावे लागणार आहे.