मुंबई : रिलायंस जिओ लवकरच अनेक सिम ब्लॉक करणार आहे. ज्यामुळे यूजर्स वेलकम ऑफरचा फायदा नाही घेऊ शकणार आहेत. हे ते सिम असणार आहेत ज्यांचं व्हेरिफिकेशन अजून झालेलं नाही. त्या लोकांचे सिम ब्लॉक केले जाणार आहेत ज्यांनी फिंगरप्रंट व्हेरिफिकेशन नाही केलं आहे. याबाबतीत भोपाळमध्ये रिलायंस जिओच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ज्या लोकांनी बाहेर आधार कार्डने E-KYC च्या माध्यमातून सिम घेतलं आहे त्यांचं सिम बंद केलं जाणार आहे. Jio सिम बंद होण्याचे मॅसेज देखील पाठवले जात आहेत.
तुम्ही जर इतर राज्याच्या आयडी प्रुफने सिम घेतलं असेल तर मग रिलायंस जिओचं सिम बंद केलं जाणार आहे. सिम घेतांना जर तुम्ही फिंगरप्रिंट वेरिफिकेशन नसेल केलं तर तुम्हाला रिलायंस जिओची फ्री ऑफर नाही मिळणार आहे. त्यामुळे ब्लॉक होण्याआधी तुम्ही तुमचे डॉक्यूमेंट गॅलरीमध्ये जाऊन जमा करु शकता.
१ एप्रिलपासून रिलायंस जिओने यूजर्सचं वेरिफिकेश संबंधात काम सुरु केलं आहे. मॅसेजच्या माध्यमातून लोकांना याबाबतीत सूचना दिल्या जात आहे.