गुंतवणुकीची पहिली पायरी 'बचत', जाणून घ्या बचतीच्या 5 टिप्स

प्रत्येक महिन्यात पगारातील 10 टक्के पैसे वाचवणे आपल्या भविष्यासाठी चांगलं असतं. यासाठी पगारातील एक भाग वाचवून त्याची चांगले रिटर्न्स मिळतील अशा स्कीममध्ये गुंतवावेत. एक चांगला व्यक्ती तोच आहे जो बचत आणि गुंतवणूकमध्ये संतुलन राखतो. 

Updated: Sep 3, 2015, 05:34 PM IST
गुंतवणुकीची पहिली पायरी 'बचत', जाणून घ्या बचतीच्या 5 टिप्स title=

मुंबई: प्रत्येक महिन्यात पगारातील 10 टक्के पैसे वाचवणे आपल्या भविष्यासाठी चांगलं असतं. यासाठी पगारातील एक भाग वाचवून त्याची चांगले रिटर्न्स मिळतील अशा स्कीममध्ये गुंतवावेत. एक चांगला व्यक्ती तोच आहे जो बचत आणि गुंतवणूकमध्ये संतुलन राखतो. 

पाहा चांगल्या बचतीसाठी या 5 टिप्स

1. सर्वात पहिले बजेट बनवा - अनावश्यक खरेदीपासून वाचण्यासाठी सर्वात पहिले आपण महिन्याचं बजेट ठरवावं. दर महिन्यात अशा वस्तूंची लिस्ट तयार करा ज्या आपल्याला विकत घ्यायच्या आहेत. यामुळे आपल्याला खर्चाचा अंदाज येईल, त्यातून काय या महिन्यात घ्यायचं काय पुढच्या महिन्यात हे सुद्धा बजेट पाहून ठरवता येईल.

2. शॉपिंगवर आवर घाला - नेहमी आपण पाहतो सॅलगी हातात येताच आपण स्वप्न पाहायला लागतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आपण स्वत:ला श्रीमंत समजतो. मग आपण खरेदीच्या मागे लागतो. मात्र महिना अखेरीस मग कंगाल होतो आणि महिना अखेरीस उधार मागायची वेळ येते. म्हणून बजेट बनवा आणि अतिरिक्त खरेदी टाळा.

3. डिस्काउंट आणि ऑफर्सची वाट पाहा - प्रयत्न करा ज्या वस्तूंची लगेच गरज नसेल अशा वस्तूंच्या खरेदीसाठी डिस्काउंट किंवा ऑफर्ससची वाट पाहा. नेहमी सणांच्या काळात डिस्काउंट सोबत काही एक्स्चेंज ऑफर पण असते.

4. क्रेडिट कार्डचा वापर टाळा - खरेदीसाठी क्रेडिट कार्ड गरजेचा असतो, पण त्याचा अधिक वापर पुढील महिन्याच्या सॅलरीवर अचानक बोजा वाढवतो. म्हणून शक्य असेल तेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करू नये. कारण क्रेडिट कार्डमुळे मग अनावश्यक खरेदी आपण करतो आणि नंतर व्याजाचा बोजा आपल्याला सहन करावा लागतो. क्रेडिट कार्डाद्वारे खरेदी करतांना क्रेडिट पॉइंट्सवर नजर ठेवा आणि खूप गरज असेल तेव्हाच वापर करा. 

5. सार्वजनिक वाहनांचा वापर - जर आपल्या शहरात सार्वजनिक बसची सुविधा चांगली असेल तर रोज ऑटो किंवा टॅक्सी पकडण्यापेक्षा येण्या-जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. याशिवाय आपण पूलिंग सुविधा पण घेऊ शकता. त्यामुळं एकाच्या कारमध्ये पेट्रोल भरून शेअरिंग केल्यानं पैसा पण वाचतो आणि पेट्रोल पण. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.