एका झटक्यात या स्मार्टफोनचे लाखो हॅन्डसेटस बुक

मोबाईल कंपनी लि-इको चा फ्लॅगशिप स्मार्टफोन 'लि-इको लि वन एस इको' भारतात दाखल झालाय. या स्मार्टफोनच्या फ्लॅश सेल सुरू झाल्याझाल्या एक लाख जणांनी हँन्डसेट बुक केलाय. 

Updated: May 14, 2016, 02:14 PM IST
एका झटक्यात या स्मार्टफोनचे लाखो हॅन्डसेटस बुक title=

नवी दिल्ली : मोबाईल कंपनी लि-इको चा फ्लॅगशिप स्मार्टफोन 'लि-इको लि वन एस इको' भारतात दाखल झालाय. या स्मार्टफोनच्या फ्लॅश सेल सुरू झाल्याझाल्या एक लाख जणांनी हँन्डसेट बुक केलाय. 

फ्लिपकार्टवर सेल दरम्यान या फोनची या स्मार्टफोनची किंमत आहे ९,९९९ रुपये निर्धारित करण्यात आली होती. या स्मार्टफोनची खरी किंमत आहे १०,८९९९ रुपये. 

या स्मार्टफोनचं वैशिष्ट्यं म्हणजे मोबाईलसोबत लि इको मेंबरसिपचं एका वर्षाचं सब्सस्क्रिप्शन फ्री दिलं जातंय. 

या फोनचं वैशिष्ट म्हणजे याची बॅटरी... या बॅटरीला तुम्ही ५ मिनिटं चार्ज केली तर जवळपास ३.५ तासांचा टॉकटाईम तुम्हाला मिळू शकेल, असा दावा कंपनीनं केलाय. 

'लि-इको लि वन एस इको'ची वैशिष्ट्यं

- डिस्प्ले : १०८५ X १९२० पिक्सल रिझोल्युशनसोबत ५.५ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले

- प्रोसेसर : १.८५ गिगाहर्टझचा ६४ बिट ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ एक्स १० soc प्रोसेसर

- ऑपरेटिंग सिस्टम : अॅन्ड्रॉईड ५.० लॉलीपॉप

- ४ जी सपोर्टिव्ह

- बॅटरी : ३००० मेगाहर्टझ 

- कॅमेरा : १३ मेगापिक्सल, फ्लॅशसहीत

- फ्रंट कॅमेरा : ५ मेगापिक्सल

- रॅम : ३ जीबी 

- इंटरनल मेमरी : ३२ जीबी