एनफिल्डच्या 'डिस्पॅच रायडर'ची 'रॉयल' विक्री!

२०० दुचाकी गाड्य़ांची ऑनलाईन विक्री फक्त २६ मिनिटांत.... आणि तीही भारतात... खरं वाटणार नाही...पण ऑनलाईन व्रिकीचा नवा ट्रेंड दुचाकी गाड्यांच्या व्रिकीत मोठ्या प्रमाणात रूढ झाल्याचं पुढे येतंय. 

Updated: Jul 16, 2015, 08:56 AM IST
एनफिल्डच्या 'डिस्पॅच रायडर'ची 'रॉयल' विक्री! title=

मुंबई : २०० दुचाकी गाड्य़ांची ऑनलाईन विक्री फक्त २६ मिनिटांत.... आणि तीही भारतात... खरं वाटणार नाही...पण ऑनलाईन व्रिकीचा नवा ट्रेंड दुचाकी गाड्यांच्या व्रिकीत मोठ्या प्रमाणात रूढ झाल्याचं पुढे येतंय. 

'रॉयल एन्फिल्ड'च्या डिस्पॅच रायडरच्या स्पेशल एडीशन बाईकच्या ऑनलाईन विक्रीला तुफान प्रतिसाद मिळालाय. अवघ्या २६ मिनिटांत रॉयल एन्फिल्डच्या या डिस्पॅच रायडरच्या २०० गाड्या विकल्या गेल्यात. 

भारतीय बनावटीच्या रॉयल एनफिल्डची ५०० सीसीची ही नवी बाईक ब्लू आणि डेझर्ट स्टॉर्म अशा केवळ दोन रंगात उपलब्ध असणार आहे. प्रत्येक कलरच्या २०० बाईक बनवल्या जाणार आहेत. यातील प्रत्येक रंगाच्या केवळ १०० बाईक भारतात विकल्या जातील. तर उरलेल्या १०० बाईक आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या जातील.

या बाईकची किंमत आहे फक्त २ लाख १७ हजार रुपये... या मॉडेलच्या केवळ ४०० गाड्या तयार करणार असल्याचं कंपनीनं अगोदरच स्पष्ट केलंय. त्यामुळे हे स्पेशल एडिशन आपल्याकडे असावं यासाठी साऱ्या भारतातली तरूणाई आतूरतेनं ऑनलाईन विक्रीची वाट बघत होती. 

१५ तारखेला सकाळी विक्रीला सुरूवात झाली आणि अवघ्या २६ मिनिटांत २०० गाड्यांची बुकिंगही झालं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.