महिंद्राची ‘स्मार्ट’ बाइक, कमी किंमतीत जास्त मायलेज

युवा तरुणांना डोळ्यासमोर ठेवून महिंद्रा कंपनीने ‘स्मार्ट’ बाइक बाजारात आणलीय. बाईक घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी. महिंद्राची टू व्हीलरमध्ये ‘११० सीसी सेंटूरो’ ही नवीन मोटारसाईकल बाजारात धूम माजवेल. अन्य बाईकची तुलना करता या स्मार्ट बाईकची किंमत आहे फक्त ४५ हजार रुपये.

Updated: Jul 2, 2013, 05:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जयपूर
युवा तरुणांना डोळ्यासमोर ठेवून महिंद्रा कंपनीने ‘स्मार्ट’ बाइक बाजारात आणलीय. बाईक घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी. महिंद्राची टू व्हीलरमध्ये ‘११० सीसी सेंटूरो’ ही नवीन मोटारसाईकल बाजारात धूम माजवेल. अन्य बाईकची तुलना करता या स्मार्ट बाईकची किंमत आहे फक्त ४५ हजार रुपये.

सुरवातीच्या दहा हजार बुकिंगवर याच्या किंमतीत १ हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुढच्या अडीच वर्षात महिंद्रा आणखी दहा नवीन मॉडेल बाजारात दाखल करणार आहे. ‘रिमोट’ आणि ‘अँटी थेफ्ट अलार्म’ ही दोन नवीन फीचर्स असलेली बाईक पुणे येथील ‘रिसर्च अँड डिझाइनिंग’ सेंटरमध्ये बनवण्यात आलीय. ११० सीसी सेंटूरो’च्या बाइकचा मायलेज असणार आहे ८५ किलोमीटर प्रति लीटर. तसंच या बाईकवर ५ वर्ष अथवा ७० हजार किलोमीरची वाँरंटी देण्यात येणार आहे.

सेटूरोच्या लाँचिंगनंतर साधारण तीन महिन्याच्या अंतराने अडीच वर्षात दहा नवीन माँडेल सादर करण्यात येतील, अशी माहिती महिंद्राचे अध्यक्ष ‘अनुप माथूर’ यांनी दिलीय. कंपनीची हाय आणि स्पोर्टस बाईक आणण्याची योजना आहे. सेंटूरो आणि त्यानंतर येणाऱ्या बाईकमुळे महिंद्रा टू व्हीलर कंपन्यांमध्ये देशातील अग्रगण्य कंपनी मानली जाईल असा विश्वास महिंद्राचे ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.