भारतात `व्होडका`चा बाजार 'मोडका`!

शहरी उच्च मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीत झालेल्या बदलाचा परिणाम व्होडकाच्या विक्रीवर झाला आहे. आता व्होडका कॉकटेलमध्ये मिसळून प्यायली जाते. पण फक्त व्होडका पिणं कमी होऊ लागलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 2, 2013, 04:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतात देशी दारू ही जितकी हिणकस मानली जाते, तेवढीच विदेशी दारू स्टेटस सिम्बॉल म्हणून मानली जाऊ लागली आहे. विदेशी मद्य पिणाऱ्यांमध्ये व्होडका हे खास मद्य उच्चभ्रू वर्गाचे मानले जात होते. महिलाही वाईनच्या बरोबरीने व्होडका पिण्यास महत्व देत. मात्र आता व्होडकाचा व्यापार कमी झाला आहे. टीओआयच्या सर्वेक्षणानुसार भारतात व्होडका पिणाऱ्यांची संख्या रोडावली आहे.
शहरी उच्च मध्यमवर्गीयांच्या जीवनशैलीत झालेल्या बदलाचा परिणाम व्होडकाच्या विक्रीवर झाला आहे. आता व्होडका कॉकटेलमध्ये मिसळून प्यायली जाते. पण फक्त व्होडका पिणं कमी होऊ लागलं आहे. त्यामुळे या वर्षी व्होडकाचा व्यापार ३० टक्क्यांनी कमी झाला आहे. व्होडकाचे मोठमोठे ब्रांडही भारतातील या सर्वेक्षणामुळे चिंतीत झाले आहेत.
२०११ साली भारतीय बाजारात व्होडकाची विक्री ८०.५ लाख केस (९ लीटर/केस) इतकी होती, तीच २०१२ साली ७८.४ लाख एवढी कमी झाली आहे. व्होडकामध्ये ५० टक्के भागीदारी असणाऱ्या युनायटेड स्पिरीट्स कंपनीच्या व्हाइट मिस्चिफ आणि रोमानोव्हची विक्री ११ टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र, याचा अर्थ असा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.