महिंद्राच्या रेवा कारचा ऑटोमॅटिक अवतार

जगात इलेक्ट्रिक कारची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हीच परिस्थिती देशातही आहे. महिंद्रा एंड महिंद्रा या कंपनीने भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार रेवाचा नवीन ऑटोमॅटिक अवतार सादर केला आहे.

Updated: Jul 31, 2015, 08:36 AM IST
महिंद्राच्या रेवा कारचा ऑटोमॅटिक अवतार title=

मुंबई : जगात इलेक्ट्रिक कारची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हीच परिस्थिती देशातही आहे. महिंद्रा एंड महिंद्रा या कंपनीने भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार रेवाचा नवीन ऑटोमॅटिक अवतार सादर केला आहे.

या नवीन ऑटोमॅटिक रेवा कारची किंमत 5.59 लाख पर्यंत गेली आहे. महिंद्रा कंपनीने या कारला हैद्राबादमध्ये लॉन्च केले आहे. 
महिंद्राची रेवा कार ही शहरी क्षेत्रात फारच वापरली जाते.  पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमध्ये ही इलेक्ट्रिकवरची कार वापरणे फार सोईचे असल्याचे अने ग्राहकांचे म्हणणे आहे. 

ग्राहकांना ईटूओ केअर प्रोटेक्शन प्लॅनसुद्धा दिला जाईल. याची किंमत 2999 एवढी ठेवण्याचा कंपनीचा मानस आहे. 

पाच वर्षापर्यंत हा प्लॅन वैध्य राहिल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.