तुमच्या प्रिय मित्रासोबत करा लग्न

तुम्ही लग्न करण्याचा विचार करताय तर मग हे अगोदर जाणून घ्या. विवाहित जीवन हे आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. वैवाहिक जीवनानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. त्यामुळे विवाह करतांना काही गोष्टींचा खूप विचार केला गेला पाहिजे.

Updated: Apr 3, 2016, 08:37 PM IST
तुमच्या प्रिय मित्रासोबत करा लग्न title=

मुंबई : तुम्ही लग्न करण्याचा विचार करताय तर मग हे अगोदर जाणून घ्या. विवाहित जीवन हे आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. वैवाहिक जीवनानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात. त्यामुळे विवाह करतांना काही गोष्टींचा खूप विचार केला गेला पाहिजे.

आपण सर्वाधिक वेळ हा आपल्या मित्रांसोबत घालवतो. एकमेकांसोठी खर्च करणे, एकमेकांना महत्त्वाचा वेळ देणे हे मित्रांमध्ये सहज होतं. एकत्र बराच काळ राहिल्यामुळे एकमेकांची मन जवळ येतात आणि आपण मित्रांना खूप चांगल्या प्रकारे ओळखू लागतो.

मित्रावर प्रेम होणे ही काही वेगळी गोष्ट नाही. पण त्याच्यासोबत लग्नाचा विचार करतांना खूप प्रश्न मनात येतात. जगभरातून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात एक मोठी गोष्ट समोर आली आहे.

आपल्या मित्रासोबत लग्न करणाऱ्या जोडप्याचा ७० टक्के घटस्फोट होत नाही. असं या सर्वेक्षणातून समोर आलंय. मित्रासोबत लग्न केल्यानंतर जीवनात आणखी आणखी आनंद मिळतो. असं देखील या सर्वेक्षणात म्हटलंय.

लग्न झाल्यानंतर एकमेकांना सांभाळून घेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही लव्ह मॅरेज जरी करत नसाल तरी तुम्ही सुखी वैवाहिक जीवन जगू शकता. फक्त एकमेकांना समजून घेण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा आणि पार्टनर वाईट असला तर त्याला समजून घ्या आणि त्याला बदलण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या मित्राबाबत सगळं काही व्यवस्थित जाणून घ्या. त्यानंतर तुमच्या घरी सांगा. तो मुलगा कसा तुमच्यासाठी योग्य आहे हे समजवून सांगा. फक्त भावनेच्या आहारी जावून लग्न करण्याचा प्रयत्न करु नका कारण तुम्हाला पूर्ण आयुष्य तुमच्या मित्रासोबत घालवायचं आहे. त्यामुळे सगळ्या बाजूनी विचार करुन निर्णय घ्यायला काही हरकत नाही.