नवी दिल्ली : तुम्ही चारचाकी घेण्याचा विचार करत असाल तर थोडावेळ धरा. मारुती-सुझुकी अशी एक कार बाजारात आणत आहे, ४८.२ किमी मायलेज देईल. ही कार स्विफ्टचे हायब्रिड मॉडेल असणार आहे.
मारुती-सुझुकीने दावा केला एका लिटरमध्ये ४८.२ किमी ही कार धावणार आहे. या कारचे नाव 'रेंज एक्सटेंटर Ev Hybrid' असे नाव आहे. कंपनी ही कार सार्वजनिक लॉंच करणार आहे. मात्र, कंपनीने या कारची किमतीबाबत खुलासा केलेला नाही.
हायब्रिड मॉडेलमधील पेट्रोल पॉवरट्रेन लिथिअम-आयन बॅटरीसाठी जेनरेटरचे काम करते. त्यानंतर ही बॅटरी इलेक्ट्रिक मोटरला पॉवर सप्लायचे काम करते. या मोडमध्ये पेट्रोल इंजिन परोक्षच्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोटरला चालविण्यासाठी विज निर्माण करण्यास मदत करेल.
स्विफ्ट रेंज एक्सटेंडरचे वजन १६०० किलोग्रॅम आहे. लिथिअम-आयम बॅटरीला २०० व्हो.च्या शॉकेटने पूर्ण चार्ज होण्यासाठी १.५ तास लागतील. कारमध्ये इंफोटेनमेंट सिस्टिम, पुश स्टार्ट, स्टॉप बटन, रिमोट क्लिलेस एंट्री आणि रिअर डिस्क ब्रेक्स आदी सुविधा आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.