मुंबई : कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी पर्यावरणाला पुरक नवी कार बाजारात आणण्याची तयारी करीत आहे. स्विफ्ट मॉडेलची ही संयुक्तीक (हायब्रिड व्हरायटी) कार असणार आहे. मात्र, याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
मीडियाच्या समोर आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार स्वदेशी बाजारात हायब्रिड व्हरायटीतील या कारची प्रतिक्षा केली जात आहे. मारुतीने या कारचे नाव रेंज एक्सटेंडर ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे.
मारुती-सुझुकीने या कारचा पायलेट प्रोजेक्ट भारतात सुरु करण्याची तयारी केली आहे. कंपनीने बाजारात लोगा लॉन्च करण्याची तयारी केलेय. कंपनीचा या कारबाबत दावा आहे की, ही कार प्रति लिटर ४८.२ किमी मायलेज देईल. ज्यामुळे बाजारात स्पर्धेत टिकण्यासाठी ही बाब महत्वाची आहे. दरम्यान, ही कार लॉन्च करण्याबाबत एखादी ठराविक वेळ नाही.
ही कार तीन मॉडेलमध्ये उपलब्ध असेल. हायब्रिड, पॅरलल हायब्रिड आणि ऑल इलेक्ट्रिकमध्ये उपलब्ध असेल. या कारचे इंजित ६५८ सीसी, ३-सिलिंडर पेट्रोल इंजिन असेल. त्यामुळे ही कार ४८.२ किमी मायलेज देईल. याशिवाय या कारमध्ये इलेक्ट्रिक ड्रायव्हींग रेंज २५.५ किमीपर्यंत असेल. तसेच अन्य काही सुविधा कारमध्ये असतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.