तर लवकरच व्हॉटस अॅपवर बंदी

आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय फोन मॅसेजिंग सेवा व्हॉटस अॅपवर बंदी लावली जाण्याची शक्यता आहे, यासह इतर सर्व्हिस आयमॅसेजवरही बंदी लावली जाऊ शकते.

Updated: Jan 19, 2015, 05:59 PM IST
तर लवकरच व्हॉटस अॅपवर बंदी  title=

लंडन : आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय फोन मॅसेजिंग सेवा व्हॉटस अॅपवर बंदी लावली जाण्याची शक्यता आहे, यासह इतर सर्व्हिस आयमॅसेजवरही बंदी लावली जाऊ शकते.

ब्रिटनने व्हॉटस अॅपवर बंदी लावण्याचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र भारतातही हे अनुकरण होऊ शकते. इंग्लंडचे पंतप्रधान डेविड कॅमरून यांनी म्हटलंय की, जर मी दुसऱ्यांदा पंतप्रधान झालो तर व्हॉटस अॅप आणि आय मॅसेज अॅप बंद करणार आहे.

कॅमरून यांनी पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा पार्श्वभूमीवर हे म्हटलं आहे. व्हॉटस अॅपचा वापर सध्या जोरदार केला जात आहे. या अॅपवर होणारी बातचीत सिक्युरिटी सर्व्हिस एजन्सीसाठी सोपी गोष्ट राहिलेली नाही, यामुळे अशा अॅप्सवर बंदी लावली गेली पाहिजे.

व्हॉटस अॅपवर मूळ मेसेज पाठवणाऱ्यांचा थांग पत्ता सहज लागत नसल्याने, सुरक्षा दलासमोर हे मोठं आव्हान आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.