आई किंवा वडिलांनी मुलांसोबत आंघोळ करणं कितपत योग्य? डॉक्टर काय सांगतात बघा

अनेक पालक आपल्या लहान मुलांसोबत आंघोळ करतात. अशा पद्धतीने आंघोळ करणे योग्य आहे का? मुलांवर याचा काय परिणाम होतो? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 5, 2024, 08:07 PM IST
आई किंवा वडिलांनी मुलांसोबत आंघोळ करणं कितपत योग्य? डॉक्टर काय सांगतात बघा title=

मुलं लहान असतात तेव्हा त्यांच्या अवती भवती पालकांचा दिनक्रम अवलंबून असतो. अशावेळी वेळ वाचवण्यासाठी अनेकदा पालक मुलांसोबतच आंघोळ करतात. कारण मुलांना आंघोळ घालून आपले कपडे भिजतात अशावेळी पालकही आंघोळ करुन घेतात. पण हे करणं कितपत योग्य आहे? अशा पद्धतीने आंघोळ करण्याचा मुलांवर काय परिणाम होतो? 

या कृतीचे फायदे 
पालक मुलांसोबत जितका वेळ घालवतील तितकं त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. लहान मुलांसाठी आंघोळ हा त्यांच्या आवडीचा दिनक्रमातील एक भाग असतो. अशावेळी पालकांसोबत हा वेळ घालवणे हा मुलांसाठी आनंदाचा क्षण असतो. यामुळे मुलांचे आणि पालकांचे नाते अधिक घट्ट होते. या वेळी मुलं आणि पालक यांचे स्किन टू स्किन कनेक्शन येते. त्यामुळे याचे सकारात्मक फायदे होणे. 

पीडियाट्रिशियनची प्रतिक्रिया 
6 ते 7 वर्षाच्या मुलांसोबत आंघोळ केल्याने कोणतेही नुकसान होत नाही. अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार, 1400 पालकांचा एक सर्व्हे करण्यात आला. ज्यामध्ये आई-मुलीसोबत आणि वडिल-मुलासोबत वयाच्या 6 ते 7 वर्षांपर्यंत आंघोळ करु शकतात. 

मुलीला वडिलांसोबत आंघोळ घालणे योग्य आहे का
वडिलांनी मुलीसोबत आणि आईने मुलासोबत आंघोळ करणे चार ते पाच वर्षांपर्यंत योग्य आहे. सायकोलॉजिस्टने दिलेल्या माहितीनुसार, पालक जर या सगळ्यात जर कम्फर्टेबल असल्यास ते ही गोष्ट पुढील काही वर्षे फॉलो करु शकता. काही पालकांना यामध्ये थोडे नकोसे वाटत असेल तुम्ही या गोष्टी थांबवू शकतात. 

फायदे 
एकत्र आंघोळ करण्याचा एक मोठा फायदा हा आहे की मुलाला शरीराच्या विविध प्रकारांबद्दल माहिती मिळते आणि ते स्वीकारण्यास शिकते. त्याचा जास्तीत जास्त फायदा त्यांना त्यांच्या किशोरवयात मिळतो. या वयात, जेव्हा ते इतर मुलांना भेटतात तेव्हा ते त्यांच्या शरीराचा प्रकार स्वीकारण्यास आणि बॉडी शेमिंग टाळण्यास शिकतात.

काय करावे 
जर तुम्हाला आणि तुमच्या मुलाला एकत्र आंघोळ करणे सोयीस्कर वाटत असेल, तर तुम्ही तसे करू शकता. पण लक्षात ठेवा की, या काळात तुम्ही तुमच्या मुलावर खूप प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला पाहिजे. यामुळे तुमचे आणि त्याचे नाते अधिक घट्ट होईल.