मुंबई : मुलींबद्दलची मुलांना नेहमीच उत्सुकता असते... त्यात ही मुलगी जर त्यांची गर्लफ्रेंड असेल तर मग काही विचारूच नका... मग, तिची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता आणखीनच वाढलेली दिसते.
आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या मुलीबद्दल, तिच्या आवडी-निवडीबद्दल, तिच्या स्टेटसबद्दल इतकंच काय तर तिच्या मित्र-मैत्रिणींबद्दलच्या सगळ्या गोष्टी मुलांना जाणून घेण्याची ओढ असते. पण, मुलींच्या अशाही काही गोष्टी असतात ज्यांची मुलांमध्ये सर्वात जास्त उत्सुकता असते.
- एखाद्या मुलीशी कोणत्याही प्रकारचं नातं जोडण्यापूर्वी प्रत्येक मुलाला हे माहीत करून घ्यायचं असतं की ती आणखी कुणासोबत कमिटेड तर नाही किंवा आपल्याला आवडणारी मुलगी अगोदरपासूनच आणखी कुणासोबत रिलेशनशीपमध्ये तर नाही?
- आपल्याला आवडणाऱ्या मुलीचं तिच्या मित्रांसोबत व्यवहार कसा असतो... त्यांच्यासोबत ती कोणत्या विषयांवर जास्तीत जास्त गप्पा मारते... हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न मुलं करतात.
- आपल्या गर्लफ्रेंडचे किती पुरुष मित्र आहेत... आणि ती त्यांच्याशी कशी वागते... हे जाणून घेण्याची मुलांना नेहमीच घाई असते... कदाचित आपल्या शंकाही ते दूर करण्यासाठी असं करत असतात.
- आपण ज्या मुलीला आपलं मानलंय ती मुलगीही आपल्याशी तितकीच एकनिष्ठ आहे का? आणि ती आपल्यावर किती प्रेम करते? हे जाणून घेण्याचा प्रत्येक मुलगा प्रयत्न करताना दिसतो. आपल्या प्रेयसीच्या डोळ्यांत ते स्वत:साठी खरं प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतात.
- आपण ज्या मुलीबद्दल खूप गंभीर आहोत त्या मुलाला सेक्सशी निगडीत काय काय माहिती आहे? आणि यासंबंधी त्यांच्या काय इच्छा आहेत, हे जाणून घेण्याचीही मुलांमध्ये खूप उत्सुकता असते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.