मायक्रोसॉफ्टच्या सत्य नडेलांना मिळाले ८.४ कोटी डॉलर पगार

 मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेला यांना या वर्षी पगार म्हणून ८.४३ कोटी डॉलर मिळाले आहे. विशेष म्हणजे सत्य नडेला नुकतेच एक वादग्रस्त विधान केले होते की, महिलांनी पगार वाढीची मागणी केली नाही पाहिजे. त्यांनी ‘कर्म’ करण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर यांच्या पगाराचे हे विवरण महत्वपूर्ण मानले जात आहे. 

PTI | Updated: Oct 21, 2014, 03:08 PM IST
मायक्रोसॉफ्टच्या सत्य नडेलांना मिळाले ८.४ कोटी डॉलर पगार title=

न्यू यॉर्क :  मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेला यांना या वर्षी पगार म्हणून ८.४३ कोटी डॉलर मिळाले आहे. विशेष म्हणजे सत्य नडेला नुकतेच एक वादग्रस्त विधान केले होते की, महिलांनी पगार वाढीची मागणी केली नाही पाहिजे. त्यांनी ‘कर्म’ करण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर यांच्या पगाराचे हे विवरण महत्वपूर्ण मानले जात आहे. 

अमेरिकेच्या प्रतिभूती आणि विनिमय आयोगाला दिलेल्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्टने नडेला यांना जून २०१४ ला संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण वेतन म्हणून ८.४३ कोटी डॉलर देण्यात आले. गेल्या वर्षी २०१३ मध्ये त्यांना ७६.६ लाख डॉलर पगार मिळाला होता. 

नडेला २०१४ च्या पॅकेजमध्ये ९ लाख १८ हजार ९१७ डॉलर पगार, ३६ लाख डॉलर बोनस आणि ७.९७७ कोटी डॉलरचे शेअरचा समावेश आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.