मुंबई : सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावने फेसबूक आणि ट्विटरवर अनेक फेक अकाउंट बनविण्यात आले आहे. या फेक अकाउंटच्या माध्यामातून राज ठाकरे यांच्या नावाने दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणारे पोस्ट टाकण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना यांचा त्रास होत आहे.
मनसेचे प्रचार प्रमुख सचिन मोरे यांनी ही माहिती दिली आहे. यासारख्या कोणत्याही प्रकारच्या पोस्टचे समर्थन स्वत: राज ठाकरे करणार नाहीत. मोरे यांनी यांची तक्रार मुंबई पोलीस गुन्हे शाखा यांच्याकडे देखील नोंदविली आहे. मनसेने जॉइंट कमिशनर यांना लिखित स्वरूपात देखील तक्रार केली आहे. राज ठाकरे स्वत: बोलत असल्याचे सांगून टीका करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे.
तसेच अकाउंटद्वारे लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून हे पेज जॉइन करण्याचे आमंत्रण देखील देण्यात येत आहे. फेसबूक आणि ट्विटरवरच्या माध्यमातून राज ठाकरे हे स्वत: बोलत असल्याचा आभास निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.