मुंबई : मोबाईल टॉवरपासून निघणाऱ्या रेडिएशनवर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी शरीरात एक किंवा दोन मि.मि. पर्यंतच पोहोचत असल्याने गर्भवतींच्या बाळालासुध्दा यापासून कोणतीच हानी पोहोचत नसल्याचा दावा मोबाईल ऑपरेटर्सच्या एका परिषदेत करण्यात आला.
मोबाईलच्या रेडिओ लहरींचे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्याकरिता सीओएआयव्दारा हॉटेल ट्रायडंटमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
भारत जगात टेलिकम्युनिकेशनमधील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. सेल टॉवर्स आणि मोबाईल हॅण्डसेटसमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींमुळे या क्षेत्रासमोरील अडचणी पुढे आणण्यासाठी जनतेसमोर आमची बाजू मांडणार असल्याचे सीओएआयचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितले.
आपल्या देशात जगाच्या तुलनेत दहा पटीने कमी रेडिएशन आहे. त्यामुळे मोबाईल टॉवर्स सुरक्षित असून त्यावरील रेडिएशनचे कॅन्सर होतो हे कुठेही सिध्द झालेले नसल्याचे मॅथ्यूज यांनी स्पष्ट केले.
या परिषदेत मोबाईल रेडिएशन क्षेत्रातील विविध नामवंतांच्या मुलाखतीत व्हिडीओ प्रोजेक्टरवर दाखविण्यात आल्या.
या मुलाखतीत टाटा हॉस्पिटलपासून ते रेडिओलॉजिस्टपर्यंत साऱ्यांचे इंटरव्ह्यू दाखविण्यात आले. आता या टेलिफिल्मचे सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमातून प्रदर्शन करुन रेडिएशन संबंधीचे सर्वसामान्य जनतेतील गैरसमज दूर करणार असल्याचे राजन मॅथ्यूज यांनी स्पष्ट केले.
डायरेक्टर ऑफ टेलिकॉममार्फत लवकरच मोबाईल टॉवरचे रेडिएशन तपासण्यासाठी टेलिकॉम इन्फोर्समेंट, रिसोर्स अॅण्ड मॉनिटरिंग सेल अर्थात टर्म नावाची संस्था स्थापन केली जाणार आहे.
http://www.dot.ov.in/term/term-security या लिंकवर भेट देऊन आपापल्या विभागात रेडिएशनवर नजर ठेवणे सामान्यांना शक्य होणार आहे. लोकांना मोबाईल टॉवरसंबंधी सर्व तक्रारी येथे करता येतील.
भारतात मोबाईल टॉवर्सचे रेडिएशन जगापेक्षा दहापट कमी आहे आणि हे निकष मोडणाऱ्या कंपनीला 10 लाखांच्या दंडाची कठोर शिक्षा असल्याचे मॅथ्यूज यांनी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.