www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
कमी शिक्षणामुळं जीविकेवर होणारा परिणाम यामुळं आपल्या मानसिक स्थितीवर जास्त परिणाम होतो, असं आतापर्यंत मानलं जात होतं. मात्र वैज्ञानिकांच्या एका नव्या शोधानंतर हे लक्षात आलंय की, खूप जास्त शिक्षणानंसुद्धा मानसिक आजार होण्याची भीती बळावलीय.
वैज्ञानिकांच्या मते ज्यांना शिक्षणानुसार नोकरी कमी-अधिक प्रमाणातली मिळालीय. त्यांच्यात मानसिक आजारानं ग्रस्त होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं या अभ्यासात दिसून आलंय. हा अभ्यास २१ युरोपीय देशांच्या १६ हजार ६०० नोकरी करणाऱ्यांच्या अभ्यासावरुन घेण्यात आलाय. सर्व्हेक्षणात २५ ते ६० वय असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता.
‘लाईव्ह सायंस डॉट कॉम’चे अभ्यासक आणि बेल्जियमच्या घेंट विद्यालयातील सामाजिक विज्ञान विषयाचे प्राध्यापक पीट ब्रेके यांच्या मते, “अतिशिक्षित लोकांमध्ये मानसिक तणावाचं प्रमाण अधिक असण्याचं कारण म्हणजे, त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना नोकरी मिळत नाही, हे होय”. शनिवारी न्यूयॉर्क इथं झालेल्या अमेरिका सामाजिक समितीच्या बैठकीत वैज्ञानिकांनी आपला शोधनिबंध सादर केला. त्यांनी अभ्यासात सहभागी उमेदवारांना प्रश्न विचारुन त्यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास केला.
कमी शिकलेले व्यक्ती नोकरीत स्वत:वर विश्वास न ठेवता कधीकधी जे सहकार्य़ करु शकणार नाही, अशा व्यक्तींकडून मदतीची अपेक्षा करतात. ज्यामुळं त्यांच्या मानसिक तणावात वाढ होते. याशिवाय खूप शिक्षण घेतलं असेल आणि त्यामानानं आर्थिक आवक कमी प्रमाणात होत असेल, तरीही उच्चशिक्षित लोकांचं मानसिक स्वास्थ बिघडतं, असं ब्रेके म्हणतात.
ब्रेके यांच्या अभ्यासानुसार हे स्पष्ट होतंय, की जर तुम्हाला मानसिक तणावाखाली यायचं नसेल तर करियरच्या सुरुवातीला जरी शिक्षणापेक्षा कमी पगाराची नोकरी मिळाली असली, तरी काही काळानंतर दुसऱ्या चांगल्या नोकरीचा शोध घ्यावा, नाहीतर तुम्ही मानसिक तणावाखाली येऊ शकता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.