जाणून घ्या क्लिन शेव मुलांकडे का आकर्षित होतात मुली?

तुम्ही नेहमी पाहिलं असेल की क्लिन शेव करणाऱ्या तरूणांवर तरूणी लट्टू होतात. तर दाढी-मिशी ठेवणाऱ्या पुरूषांना त्या जास्त भाव देत नाही. या मागील कारण आता समोर आलं आहे. 

Updated: Nov 11, 2015, 03:32 PM IST
जाणून घ्या क्लिन शेव मुलांकडे का आकर्षित होतात मुली?  title=

बंगळुरू : तुम्ही नेहमी पाहिलं असेल की क्लिन शेव करणाऱ्या तरूणांवर तरूणी लट्टू होतात. तर दाढी-मिशी ठेवणाऱ्या पुरूषांना त्या जास्त भाव देत नाही. या मागील कारण आता समोर आलं आहे. 

निल्सन इंडियाने केलेल्या सर्वेनुसार हे समोर आले आहे की, क्लीन शेव करणारे पुरूष हे जास्त प्रेमळ आणि एकनिष्ठ असतात. ते खुल्या विचारांचे असतात. तर दाढीवाले पुरूष रुढीवादी मानसिकतेचे असतात. 

तसेच दाढी ठेवणारे पुरूष हे स्वच्छ नसतात, ते आपली दाढी करू शकत नाही तर ते अस्वच्छ असतील अशी तरूणींची भावना निर्माण होते. आळशी असल्याने ते दाढी वाढवतात असाही समज असतो. 

या सर्वेत १०० पुरूष दाखविण्यात आले. त्यातील ८० टक्के महिलांनी क्लिन शेव पुरूषांना पसंती दिली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.