अबब! आयफओनवर तब्बल ३४ हजारांपर्यंतची सूट

दिवाळीनिमित्त स्मार्टफोन यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. अॅपलनं आपल्या लेटेस्ट आयफोनवर तब्बल ३४ हजारांपर्यंतची सूट दिलीय.

Updated: Nov 9, 2015, 04:12 PM IST
अबब! आयफओनवर तब्बल ३४ हजारांपर्यंतची सूट title=

मुंबई: दिवाळीनिमित्त स्मार्टफोन यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. अॅपलनं आपल्या लेटेस्ट आयफोनवर तब्बल ३४ हजारांपर्यंतची सूट दिलीय.

एका वृत्तानुसार, अॅपलनं आयफोन ६एस आणि आयफोन ६एस प्लसवर बायबॅक ऑफर दिलीय आणि ग्राहकांना सूटही दिलीय. आयफोनच्या चार वितरकांपैकी इनग्राम मायक्रोनं आपल्या काही स्टोअर्समध्ये ही बायबॅक स्किम सुरू केलीय. इतर डिस्ट्रिब्युटरही लवकरच ही योजना सुरू करतील.

आणखी वाचा - भारताच्या 45 टक्के 3जी डिव्हाईसमध्ये 3जी उपयोग नाही - नोकिया

गेल्या वर्षीय लॉन्च झालेल्या आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसच्या किमती ६२ हजारांपासून ९२ हजारांपर्यंत होत्या. पण त्यामुळं त्याची विक्री कमी झाली होती. पण आता या दिवाळी ऑफरमुळे आयफोनच्या विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा कंपनीला आहे. 

बायबॅक स्किम अंतर्गत आयफोनचे जुने मॉडल्सा खरेदी केले जातील. जेणेकरून रिटेलर्सवर बोजा पडणार नाही. 

आणखी वाचा -  अवघ्या ४,६६६ रुपयांत ४जी स्मार्टफोन!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.