नवी दिल्ली : ऑनलाईन खरेदीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे... यामध्ये, रिटेल व्यापाऱ्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. याच छोट्या रिटेल व्यापाऱ्यांसाठी आता एक नवीन ई-कॉमर्स वेबसाईट सुरू झालीय... ई-लाला (www.elala.in) ही वेबसाईट ई-कॉमर्स, छोटे व्यापारी आणि ग्राहक यांच्यात मेळ घडवून आणणार आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, छोटे दुकानदार आपल्या दुकानासोबतच या पोर्टलच्या साहाय्यानं आपल्या वस्तून ऑनलाईन पद्धतीनंही सहज विकू शकतील. त्यामुळे, कोणताही ग्राहकाकडे रिटेल व्यापाऱ्यांकडून ऑनलाईन खरेदीचाही ऑप्शन उपलब्ध असेल.
खरेदी केलेल्या वस्तूंचं पेमेंट करण्यासाठी या वेबसाईटनं एचडीएफसी बँकेशी हातमिळवणी केलीय. 'ई-लाला' ही वेबसाईट ग्राहक आणि छोटे व्यापारी या दोघांनाही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. ही वेबसाईट म्हणजे दोघांसाठीही एक प्लॅटफॉर्म आहे जिथे छोटे व्यापारी आपल्या वस्तू विकण्यासाठी ई-कॉमर्स पद्धतीचा वापर करू शकतात आणि ग्राहक आपल्याला हव्या त्या गोष्टी विकत घेण्यासाठी... ग्राहकांनी केलेलं पेमेंट हे अर्थातच थेट व्यापाऱ्यांपर्यंत पोहचणार आहे.
ई-कॉमर्स आणि मॉलच्या चलतीमुळे नुकसान होणारे छोटे व्यापारी या वेबसाईटचा वापर करून नक्कीच फायदा मिळवू शकतात. त्यामुळे, साहजिकच सध्या चलती असणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाईटसमोरही एक नवा स्पर्धक उभा ठाकतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.