स्वस्तातला नवा स्मार्टफोन `झोलो 8 एक्स-1000′

सध्या मार्केटमध्ये स्मार्टफोनची चलती दिसून येत आहे. झोलोने स्वस्तातला नवा स्मार्टफोन  `झोलो 8 एक्स-1000′ हा लाँच केलाय. या फोनचा डिस्प्ले पाच इंच असणार आहे. तसेच अॅंड्रॉईड आधारित असणार आहे.

Updated: Aug 12, 2014, 04:55 PM IST
स्वस्तातला नवा स्मार्टफोन  `झोलो 8 एक्स-1000′   title=

मुंबई : सध्या मार्केटमध्ये स्मार्टफोनची चलती दिसून येत आहे. झोलोने स्वस्तातला नवा स्मार्टफोन  `झोलो 8 एक्स-1000′ हा लाँच केलाय. या फोनचा डिस्प्ले पाच इंच असणार आहे. तसेच अॅंड्रॉईड आधारित असणार आहे.

`लावा इंटरनॅशनल’ने अॅंड्रॉईडसहित तयार करण्यात आलेल्या `युजर इंटरफेस हाइव’ बरोबर `झालो 8 एक्स-1000′  हा स्मार्टफोन आणला आहे. अॅंड्रॉईड 4.4 किटकॅट हे लेटस व्हर्जन यात असणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये 720 x 1280 पिक्सल रिझोल्युशन असणार असून याचा डिस्प्लेः 5 इंच आहे. ड्रगनट्रेल ग्लास पॅनल आहे. तसेच 1.4 गीगाहर्ट्झ मीडियाटेक प्रासेसर या फोनमध्ये आहे.

स्मार्टफोनची 2 जीबी रॅम असून 8 एमपी रिअर आणि 2 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरी 1920 एमएएच आहे. या फोनची किंमत13,999 रुपये आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.