'तुमचा मॅसेज वाचलाय' हे आता 'व्हॉटसअप'ही सांगणार

‘व्हॉटस् अप’ हे मोबाईल अॅप्लिकेशन एव्हाना जवळपास प्रत्येक मोबाईलवर दाखल झालीय. पण, यामुळे अनेकदा ‘कम्युनिकेशन’मध्ये काही गोंधळ झालेलाही अनेकदा समोर आला... कारण, या अॅप्लिकेशनवर कुणी तुमचा मॅसेज वाचला किंवा नाही हे तुम्हाला कळण्यासाठी आत्तापर्यंत काही मार्ग नव्हता... पण, आता ही सोय तुमच्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. 

Updated: Nov 6, 2014, 04:27 PM IST
'तुमचा मॅसेज वाचलाय' हे आता 'व्हॉटसअप'ही सांगणार title=

मुंबई : ‘व्हॉटस् अप’ हे मोबाईल अॅप्लिकेशन एव्हाना जवळपास प्रत्येक मोबाईलवर दाखल झालीय. पण, यामुळे अनेकदा ‘कम्युनिकेशन’मध्ये काही गोंधळ झालेलाही अनेकदा समोर आला... कारण, या अॅप्लिकेशनवर कुणी तुमचा मॅसेज वाचला किंवा नाही हे तुम्हाला कळण्यासाठी आत्तापर्यंत काही मार्ग नव्हता... पण, आता ही सोय तुमच्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. 

‘व्हॉटसअप’वर मी तुमचा मॅसेज पाहिलाच नाही... अशी कारणं अनेकदा तुम्हाला ऐकायला मिळाली असतील किंवा तुम्ही कुणाला तरी ऐकवली असतील. पण, अशी कारणं तुम्ही बनवत असाल तर तात्काळ अशी कारणं देणं बंद करा कारण आता व्हॉटसअपनं एक नवा फीचर लॉन्च केलंय ज्यामुळे तुम्ही मॅसेज वाचलात किंवा नाही, हे समोरच्या व्यक्तीला कळू शकेल.

काय आहे हे नवीन फिचर...
सध्या, आपल्या मोबाईलवरून आपण ‘व्हॉटस अप’ मॅसेज पाठवल्यानंतर मेसेजच्या बाजुला एक हिरव्या रंगाचा टिक मार्क दिसतो. याचा अर्थ आहे आपला मॅसेज व्हॉटसअपच्या सर्व्हरवर पोहचलाय. त्यानंतर इथे दोन हिरव्या रंगाचे टिक मार्क दिसतात. याचा अर्थ आहे आपला मॅसेज ज्याला पाठवलाय त्याच्या मोबाईलवर यशस्वीरित्या पोहचलाय. पण, यामुळे तुमचा मॅसेज समोरच्या व्यक्तीनं पाहिलाय किंवा नाही हे मात्र समजू शकत नाही. 

व्हॉटस अपच्या नव्या फिचरमध्ये हे दोन टिक मार्क्स निळ्या रंगात बदलतील... तेव्हा समजून जा की तुम्ही पाठवलेला मॅसेज समोरच्या व्यक्तीनं वाचलाय.
हे फिचर मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचं व्हॉटसअप अपडेट करावं लागणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.