नोकिया 3310 रीलाँच, आणखी 3 अँड्रॉईड स्मार्टफोनही लाँच

बार्सिलोनामध्ये सुरु असलेल्या MWC 2017च्या प्री-इव्हेंटमध्ये नोकियाने रविवारी तीन अँडॉईड फोन लाँच केले. हे तीनही फोन नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 आहेत. याशिवाय कंपनीने बहुप्रतीक्षित नोकिया 3310 हा फोन तब्बल 17 वर्षांनी पुन्हा लाँच केलाय.

Updated: Feb 27, 2017, 12:48 PM IST
नोकिया 3310 रीलाँच, आणखी 3 अँड्रॉईड स्मार्टफोनही लाँच

नवी दिल्ली : बार्सिलोनामध्ये सुरु असलेल्या MWC 2017च्या प्री-इव्हेंटमध्ये नोकियाने रविवारी तीन अँडॉईड फोन लाँच केले. हे तीनही फोन नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 आहेत. याशिवाय कंपनीने बहुप्रतीक्षित नोकिया 3310 हा फोन तब्बल 17 वर्षांनी पुन्हा लाँच केलाय.

फोनमधील भारतीयांचे पहिले प्रेम म्हणजे नोकिया 3310. नोकियाची मालकी सध्या HMD ग्लोबल कंपनीकडे आहे. भारतात हे फोन काही दिवसानंतर यूझर्स खरेदी करु शकणार आहे. 

नोकिया 3310च्या अपडेटेड व्हर्जनमध्ये लोकप्रिय सापाचा गेमही असणार आहे. तसेच जुनी रिंगटोनही ठेवण्यात आलीये. ज्यामुळे या नव्या फोनशी त्यांचे नाते अधिक घट्ट होईल. 

नोकिया 3310, 3,5, आणि 6 हे फोन या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील. नवा 3310 हा फोन स्मार्टफोनच्या ऐवजी फीचर फोन असणार आहे. यात एस 30+ऑपरेटिंग सिस्टीमवर चालेल.