'व्हॉट्सअॅप'चा पारदर्शक कारभार! फोटो कोणी बघितला ते कळणार

सगळीकडे सध्या पारदर्शकतेची चर्चा सुरु असताना व्हॉट्सअॅपनं मात्र हा मुद्दा भलताच गांभिऱ्यानं घेतला आहे.

Updated: Feb 26, 2017, 05:20 PM IST
'व्हॉट्सअॅप'चा पारदर्शक कारभार! फोटो कोणी बघितला ते कळणार title=

मुंबई : सगळीकडे सध्या पारदर्शकतेची चर्चा सुरु असताना व्हॉट्सअॅपनं मात्र हा मुद्दा भलताच गांभिऱ्यानं घेतला आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅपनं स्टेटस नावाचा नवा ऑप्शन आता यूजर्सना दिला आहे. या स्टेटसमध्ये तुम्हाला फोटो ठेवून यावर कॅप्शन लिहिता येणार आहे. तुमचा हा फोटो आणि कॅप्शन कोणी बघितलं हे आता तुम्हाला कळणार आहे. 24 तासांसाठी तुमचं हे स्टेटस तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्यांना पाहता येणार आहे.