नोकियाचा ‘X 2’ अँड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च

 गेल्या आठवड्यापासून जाहिरातींत दिसणारा ‘नोकिया’चा नवा स्मार्टफोन X2 मंगळवारी कंपनीनं अधिकृतरित्या लॉन्च केलाय. सहा महिन्यापूर्वी कंपनीने नोकिया X  सिरीजमध्ये नवीन हॅन्डसेट सादर करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, कंपनीनं X2 हा मोठ्या स्क्रिनचा ड्युएल सिम स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. 

Updated: Jun 25, 2014, 11:40 AM IST
नोकियाचा ‘X 2’ अँड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च title=

नवी दिल्ली :  गेल्या आठवड्यापासून जाहिरातींत दिसणारा ‘नोकिया’चा नवा स्मार्टफोन X2 मंगळवारी कंपनीनं अधिकृतरित्या लॉन्च केलाय. सहा महिन्यापूर्वी कंपनीने नोकिया X  सिरीजमध्ये नवीन हॅन्डसेट सादर करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, कंपनीनं X2 हा मोठ्या स्क्रिनचा ड्युएल सिम स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. 

 नवीन जनरेशनला नजरेसमोर ठेऊन बनवण्यात आलेल्या या फोनमध्ये अँन्ड्रॉईड ही ‘नोकिया’साठी नवीन असलेली ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यात आलीय. या फोनची स्क्रिन 4.3 इंच तर 1.2 जीएचजेड ड्युएल कोर स्नॅपड्रॅगन 200 चा प्रोसेसर यात वापरण्यात आलाय. फोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 4 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे.

X सीरिजमध्ये याआधी उतरवण्यात आलेल्या स्मार्टफोमध्ये नेव्हिगेशन बटण मागच्या बाजूला देण्यात आलं होतं. मात्र, या नवीन स्मार्टफोनध्ये हेच बटण खालच्या बाजुला देण्यात आलंय. त्यामुळे ते वापरायलाही सोप्पं झालंय. 

या स्मार्टफोनचा रिअर कॅमरा 5 मेगापिक्सल, बॅटरी क्षमता 1800 एमएएच आहे. मायक्रोसॉफ्टचे अॅप म्हणजेच स्काईप, आउटलुक डॉट कॉम आणि वन ड्राइव्ह 15 जीबी स्टोरेज यात उपलब्ध असेल. 

युजर्सना नोकिया स्टोर्समधून बिंग सर्च अॅप, यामेर आणि एक्स बॉक्स गेम्स, स्नॅप अटॅक, वर्डामेंट, किनेक्टिमल्स उपलब्ध होऊ शकेल. नोकियाने पहिल्यांदाच वन नोटची संकल्पना जोडली आहे. त्यामुळे लोकांना क्लाउड सर्व्हिसचा अनुभव मिळणार आहे. 

तसेच लाईन, व्ही चॅट, पाथ, फेसबुक मॅसेंजरदेखील यात तुम्हाला वापरता येतील. यात मॅप आणि मिक्स रेडिओ प्रीलोडेड आहे त्या आपल्याला ऑफलाईन ही चालवता येऊ शकेल. 

या फोनचे डिझाईन अगोदरप्रमाणेच आहे. त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. ल्युमियाप्रमाणेच वेगवेगळ्या कलर्सच्या ऑप्शनमध्ये हा स्मार्टफोन तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.