मुंबई : हल्ली लग्न जमवण्याची प्रक्रिया पूर्वीइतकी किचकट राहिलेली नाही. आमच्या मुलीसाठी स्थळ शोधा यासाठी वधूपित्याच्या पूर्वीसारखे जोडेही झिजवावे लागत नाही. वर्तमानपत्रे, मॅट्रिमोनी वेबसाईटवर हल्ली लग्नासाठी स्थळे शोधली जातात. वर्तमानपत्रात वधू/वर पाहिजे अशा अनेक जाहिराती असतात.
यात वधू/वराची काय अपेक्षा आहे, आपला होणारा नवरा/बायको कसे असावेत याबाबतच्या अपेक्षा लिहिलेल्या असतात. मात्र अनेकदा काही जाहिरातीतील अपेक्षा वाचल्या तर खरंच हैराण व्हायला होते. हल्लीच पिढीचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वावर असतो. स्मार्टफोन्स आल्याने हातात अख्ख जगं आलंय. त्यामुळे तासनंतास सतत ही तरुण मंडळी मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असतात. कधीही पाहा फेसबुक, व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन असतात.
सोशल मीडियाची ही क्रेझ पाहता एका वर्तमानपत्रात वधू पाहिजे अशी जाहिरातील अट पाहून तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल. या जाहिरातीत मुलगी हवी मात्र ती फेसबुक यूज करणारी नको असे म्हटले होते. कदाचित भविष्यातील सोशल मीडियाचे जीवनातील अतिक्रमण पाहता ही अट घातली असावी. अशा प्रकारच्या अनेक अजब गजब जाहिराती वर्तमानपत्रात वा इतर ठिकाणी पाहायला मिळतात.
यापूर्वीही आपल्या 'गे' मुलासाठी वर पाहिजे अशी जाहिरात एका आईने दिली होती. मुंबईतील एका महिलेने त्याच्या मुलासाठी ही जाहिरात दिली होती. या जाहिरातीची चर्चा जगभर सुरु होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.