इन्स्टाग्रामवर शेअर करा १ मिनिटाचा व्हिडीओ

इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर आता, जातीतजास्त ६० सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करता येणार आहे.

Updated: Mar 31, 2016, 09:51 AM IST
इन्स्टाग्रामवर शेअर करा १ मिनिटाचा व्हिडीओ title=

मुंबई : इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर आता, जातीतजास्त ६० सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करता येणार आहे. ज्यांच्यात कमी वेळेत व्हिडीओतून स्टोरी मांडण्याचं कसब आहे, त्यांच्यासाठी हे महत्वाचं ठरणार आहे.

नेटीझन्सना कमी वेळेत आपली भूमिका व्हिडीओतून कशी मांडायची, स्टोरी कशी सांगायची याचे कसब प्राप्त करण्यास हे ऑप्शन महत्वाचं ठरणार आहे.

यावर आता ब्युटी टीप्स सारख्या गोष्टीही मिनिटभरात मांडण्यास सुरूवात झाली आहे. एकंदरीत इन्स्टाग्रामवर फोटो शेअरिंग शिवाय तुम्हाला व्हिडीओ शेअरिंगचीही मजा घेता येणार आहे.