मुंबई : 'यू-ट्यूब'ची भारतीय युझर्ससाठी एक खास फिचर घेऊन येत आहे... यू ट्यूबनं भारतीय बाजारपेठेसाठी खास 'ऑफलाईन फिचर'ची घोषणा केलीय. म्हणजेच, आता तुम्हाला विना इंटरनेट यू-ट्यूब व्हिडिओ पाहता येणं शक्य होणार आहे.
यू-ट्यूबनं हे ऑफलाईन फिचर यंदाच्याच वर्षात गूगलच्या अँन्ड्रॉईड वन स्मार्टफोनसोबत लॉन्च केलं होतं. हे फिचर अँन्ड्रॉईड आणि आयओएस सिस्टमसाठी सपोर्टेबल असेल. यामुळे आता मोबाईल युझर्सना वायफाय आणि डाटा प्लॅनचा वापर करून व्हिडिओ ऑफलाईन पाहता येणार आहे.
कसं वापराल हे फिचर...
यू-ट्यूबचं हे फिचर केवळ 'अॅप'मध्ये वापरलं जाऊ शकेल. ऑफलाईन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अगोदर वाय-फाय किंवा डेटा प्लानला कनेक्ट करावा लागेल... आणि हा व्हिडिओ डाऊनलोड करावा लागेल. डाऊनलोडिंगनंतर हा व्हिडिओ अनलिमिटेड व्हिविंगसाठी पुढील ४८ तासासाठी उपलब्ध असेल.
भारतीय मोबाईल युझर्सच्या मोबाईल डाटा शुल्कात कपात करणे, ही यामागची मुख्य कल्पना... यू ट्यूबने दिलेल्या माहितीनुसार भारतीय यूझर्स दर महिन्याला यू ट्यूबवर पाच बिलीयन व्हिडिओ पाहतात. या फिचरमुळे या संख्येत वाढ होऊन २०१५ पर्यंत भारत व्हिडिओ कन्टेन्टसाठीची जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ होण्याची शक्यता आहे.
ज्या युझर्सना दिवसातून केवळ काही वेळ वाय-फाय किंवा हाय स्पीड कनेक्टिव्हिटी मिळते, अशा लोकांसाठी हे फिचर उपयोगी ठरू शकेल. शिवाय जे लोक बफरिंगसाठी घेतल्या जाणाऱ्या वेळेमुळे वैतागलेले दिसतात... असे यूझर्सही या फिचरचा वापर करू शकतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.