मुंबई : येत्या काळात यू-ट्यूब मराठीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे, जास्तच जास्त चांगले व्हिडीओ कसे यू-ट्यूबवर मराठीतून येतील यावर आमचा पुढील काळात भर असेल, असं गुगलचे सत्या राघवन यांनी म्हटले आहे.
मुंबईत यू-ट्यूबचा फॅनफेस्ट सध्या सुरू आहे, त्यावर यू-ट्यूबचे सत्या राघवन बोलत होते.
सत्या राघवन हे यू-ट्यूबचे ऑनलाईन पार्टनर-डेव्हलपमेंटचे प्रमुख आहेत, सत्या हे मुंबईकर आहेत, लहानपणी मी देखील मराठी नाटकं आणि सिनेमा घरात पाहत होतो, ते व्हिडीओ अधिकृत लोकांकडून यू-ट्यूबवर येतील, अशी अपेक्षा आपल्याला असल्याचं त्यांनी सांगितलं.
दक्षिण भारतातील चार भाषा यू-ट्यूबमध्ये मागील वर्षी वेगाने पुढे आल्या, येत्या काळात बंगाली आणि मराठीवर यू-ट्यूब लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सत्या राघवन यांनी म्हटले आहे.
फूड, ब्युटी, लहान मुलांच्या शिक्षणाशी संबंधित व्हिडीओ हे अधिक लोकप्रिय होत असल्याचं राघवन यांनी सांगितलं.
यावेळी काही आघाडीच्या यू-ट्यूब क्रिएटर्सना यू-ट्यूबने आमंत्रित केलं होतं, यात लिली सिंग, रिक्षावाली यांचाही समावेश होता, त्यांनी आपले अनुभव सर्वांशी शेअर केले.