'ओला'ने टाकली चेन्नईच्या पुरात बचावासाठी होडी

टॅक्सी सेवा अॅप सर्व्हिस ओला कंपनीने दक्षिण भारतातील चेन्नई अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोफत होडी सेवा सुरू केली आहे.

Updated: Nov 18, 2015, 09:39 PM IST
'ओला'ने टाकली चेन्नईच्या पुरात बचावासाठी होडी title=

चेन्नई : टॅक्सी सेवा अॅप सर्व्हिस ओला कंपनीने दक्षिण भारतातील चेन्नई अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोफत होडी सेवा सुरू केली आहे.

नेहमी ग्राहकांसाठी कारसेवा उपलब्ध करणाऱ्या, ओला कंपनीकडून ग्राहकांना जेवण आणि पाणी पोहोचवलं जात आहे, तसेच पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

तामिळनाडु राज्यात सुरू असलेल्या पावसात ७० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १० हजारपेक्षा जास्त लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आलंय, त्यांना शहरातील सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.