अवघ्या ९९ रुपयांत १ जीबी 4जी इंटरनेट डेटा

रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त ४जी इंटरनेट डेटा प्लान ग्राहकांसाठी आणलेत. २८ डिसेंबरपासून ही ४जी सर्व्हिस सुरु होणार असून एअरटेल आणि वोडाफोनपेक्षा ६० टक्क्याहून अधिक स्वस्त असे इंटरनेट डेटा प्लान या कंपनीने आणलेत. 

Updated: Dec 18, 2015, 04:11 PM IST
 अवघ्या ९९ रुपयांत १ जीबी 4जी इंटरनेट डेटा title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त ४जी इंटरनेट डेटा प्लान ग्राहकांसाठी आणलेत. २८ डिसेंबरपासून ही ४जी सर्व्हिस सुरु होणार असून एअरटेल आणि वोडाफोनपेक्षा ६० टक्क्याहून अधिक स्वस्त असे इंटरनेट डेटा प्लान या कंपनीने आणलेत. 

रिलायन्स जिओकडून १० जीबी ४जी इंटरनेट डेटा ५९९ रुपयांत मिळणार आहे. एअरटेल इतक्याच डेटासाठी १३५० रुपये आकारते. तर वोडाफोन १५०० रुपये आकारते. रिलायन्स जिओचीही ४जी सर्व्हिस २१ टेलिकॉम सर्कल्समधील ५ सर्कलमध्ये सुरु केली जाणार आहे.

सध्या सर्वात स्वस्त ४जी इंटरनेट डेटा वोडाफोनकडून दिला जातोय. ४जी नेटवर्कसाठी २०जीबी पॅकची किंमत २५०० रुपये आहे. तर रिलायन्स जिओ २५ जीबी ४जी डेटासाठी केवळ एक हजार रुपये आकारणार आहे म्हणजेच प्रति जीबी ४० रुपये पडणार आहेत. 

रिलायंस जिओचा डेटा प्लान

१ जीबी 4जी डेटा - ९९ रुपये

३ जीबी 4जी डेटा - २४९ रुपये

६ जीबी 4जी डेटा - ३९९ रुपये

१० जीबी 4जी डेटा - ५९९ रुपये

२५ जीबी 4जी डेटा - ९९९ रुपये

१०० जीबी 4जी डेटा - २४९९ रुपये

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x